Industry
Industry 
अर्थविश्व

लॉकडाऊनमुळे एप्रिलमध्ये भारतातील कार्बन उत्सर्जनात २६ टक्क्यांची घट

पीटीआय

जगातील कार्बन उत्सर्जनात झाली १७ टक्क्यांची घट
* कार्बन उत्सर्जनात दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात मोठी घट
* २०२०च्या अखेरपर्यत ही घट ४.४ टक्के ते ८ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज
* इंग्लंडमध्ये ३०.७ टक्के, चीनमध्ये २३.९ टक्के आणि अमेरिकेत ३१.६ टक्के घट

कोविड-१९ महामारीमुळे सूर असलेल्या लॉकडाऊनमुळे भारतातील आणि जगातील कार्बन उत्सर्जनात मोठी घट झाली आहे. एप्रिल महिन्यात भारतातील कार्बन उत्सर्जनात २६ टक्क्यांची घट झाली आहे. तर जागतिक कार्बन उत्सजर्नात एप्रिल महिन्यात १७ टक्क्यांची घट झाली आहे. एप्रिल २०१९च्या तुलनेत ही घट नोंदवण्यात आली आहे. एका अभ्यास अहवालातून ही माहिती समोर आली आहे. इंग्लंडस्थित नॅशनल क्लायमेट चेंज या जर्नलने एक आंतरराष्ट्रीय अभ्यास अहवाल प्रकाशित केला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. 

या अभ्यासानुसार जानेवारी ते एप्रिल २०२० या कालावधीत जगातील कार्बन उत्सर्जनात २०१९च्या तुलनेत मोठी घट झाली आहे. २०२०च्या अखेरपर्यत ही घट ४.४ टक्के ते ८ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज यात वर्तवण्यात आला आहे. या अभ्यास अहवालानुसार २०२० मध्ये होणारी एका वर्षातील कार्बन उत्सर्जनातील घट ही दुसऱ्या महायुद्ध संपल्यानंतची सर्वात मोठी घट आहे. भारताप्रमाणेच इतर अनेक देशांमधील कार्बन उत्सर्जनात मोठी घट झाली आहे. यात इंग्लंड, चीन आणि अमेरिकेचाही समावेश आहे.

इंग्लंडमधील कार्बन उत्सर्जनात ३०.७ टक्के आणि अमेरिकेतील कार्बन उत्सर्जनात ३१.६ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. तर चीनमधील कार्बन उत्सजर्नात २३.९ टक्के घट झाली आहे.

लॉकडाऊनच्या काळात कार्बन उत्सर्जनात ७ एप्रिलला प्रतिदिन १७ टक्क्यांची म्हणजेच १.७ कोटी टन कार्बन डाय ऑक्साईडची घट नोंदवण्यात आली आहे. अशी पातळी याआधी २००६ मध्ये नोंदवण्यात आली होती. कार्बन उत्सर्जनात होणाऱ्या घटीत जवळपास निम्मी घट रस्ते वाहतूकीमुळे झाली आहे. तर वीज निर्मिती घटल्यामुळे १९ टक्के, उद्योग थंडावल्यामुळे २५ टक्के आणि हवाई वाहतूक थंडावल्यामुळे १० टक्के घट कार्बन उत्सर्जनात झाली आहे.

अर्थात जागतिक हवामान बदलावर यावर्षीच्या कार्बन उत्सजर्नातील घटीचा फारसा परिणाम होणार नाही. कारण आतापर्यत पृथ्वीवर झालेले कार्बन उत्सर्जनासमोर हे प्रमाण खूपच कमी आहे. जागतिक हवामान बदलाला आटोक्यात आणण्यासाठी यापेक्षा कितीतरी अधिक कार्बन उत्सर्जन घटण्याची आवश्यकता आहे, असेही या अभ्यास अहवालात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT