e calculator facility by income tax department 
अर्थविश्व

इन्कम टॅक्सचं टेन्शन घेऊन नका; आकडेमोडीसाठी आलं ई-कॅलक्युलेटर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाने करदात्यांसाठी ई-कॅल्क्युरलेटर लॉंच केला आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नव्या प्राप्तिकर प्रणालीची घोषणा केली होती. यापुढे करदात्यांना जुनी किंवा नवी प्राप्तिकर प्रणाली प्राप्तिकर विवरणपत्र भरताना निवडता येणार आहे. त्यासाठी नव्या करप्रणालीनुसार किती प्राप्तिकर जमा करायचा, याची आकडेमोड नागरिकांना करता येणार आहे. अर्थात, जे करदाते नवी प्राप्तिकर रचना स्वीकारणार आहेत, त्यांना प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करताना कर वजावट आणि सूट यांचा लाभ घेता येणार नाही.

वेबसाईटवर ई-कॅलक्युलेटर उपलब्ध
प्राप्तिकर विभागाने लॉंच केलेले ई-कॅल्क्युतलेटर जुन्या आणि नवीन करप्रणालीची 2020-21 या आर्थिक वर्षासाठी तुलना करण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देते. हे ई-कॅल्क्युरलेटर प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंगच्या वेबसाइटवर म्हणजेच www.incometaxindiaefiling.gov.in/home वर उपलब्ध आहे. हे संकेतस्थळ इलेक्ट्रॉगनिक प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी वैयक्तिक करदात्यांकडून आणि इतर श्रेणीतील करदात्यांकडून वापरले जाते. प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर रिटर्न्स) दाखल करणाऱ्यांची विभागणी तीन वयोगटांत केली जाते. सर्वसाधारण नागरिक (वय वर्षे 60च्या आतील), ज्येष्ठ नागरिक (वय वर्षे 60 ते 79) आणि अतिज्येष्ठ नागरिक (वय वर्षे 79च्या वर) त्यांचे सर्व स्रोतांकडून येणारे अंदाजित वार्षिक उत्पन्न, पात्र वजावट आणि सूट यांची एन्ट्री करून जुनी प्राप्तिकर प्रणाली स्वीकाराल्यावर त्यांचे करपात्र उत्पन्न किती असेल किंवा नवीन करप्रणाली त्यांनी स्वीकारावी का, हे ठरवू शकतील.

कर आकारणीचे उत्पन्न गट असे
नव्या कर श्रेणींची आणि करदरांची घोषणा करत प्राप्तिकर प्रणाली अधिक सुलभ आणि सोपी करत असल्याचे अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटले होते. ज्या नागरिकांचे सध्या 5 ते 7.5 लाख रुपयांचे वार्षिक करपात्र उत्पन्न आहे, त्यांना फक्त 10 टक्केच प्राप्तिकर लागू होईल, तर ज्यांचे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना कोणताही प्राप्तिकर भरावा लागणार नाही. जे नागरिक कर वजावट आणि सूट यांचा लाभ घेणार नाहीत, त्यांना करदरांमधील मोठ्या कपातीचा लाभ मिळेल, असेही सीतारामन यांनी सांगितले होते.  ज्यांचे वार्षिक उत्पन्न 15 लाख रुपये आहे आणि जे कोणताही कर वजावट आणि सूट यांचा लाभ घेणार नाहीत, त्यांना 2.73 लाख रुपयांऐवजी 1.95 लाख रुपये इतका प्राप्तिकर भरावा लागणार आहे, असेही अर्थमंत्र्यांनी सांगितले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

Navi Mumbai News: नवी मुंबईत ७० हजार वाहनांचा चक्का जाम, नागरिकांसह आयात निर्यातदारांना मोठा फटका

Latest Maharashtra News Updates : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुक्ताई पालखीचे दर्शन घेत स्वागत केले

Thane Crime: ठाणे हादरलं! भाजप आमदारांच्या घरासमोरच गोळीबार; १ जण गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT