IPO Launch  Sakal
अर्थविश्व

गुंतवणूकदारांसाठी आयपीओमार्फत कमाईची संधी! जाणून घ्या कोणते आयपीओ होणार लॉन्च

तुम्हाला आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

सकाळ डिजिटल टीम

तुम्हाला आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आज आणि उद्या दोन्ही दिवशी दोन आयपीओ लाँच होत याहेत. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही मोठी कमाई करू शकता.

या वर्षी अनेक कंपन्यांनी त्यांचे आयपीओ शेअर बाजारात लॉन्च केले आहेत. यापैकी अनेकांनी आयपीओमध्ये गुंतवणूक करुन चांगला नफा कमावला आहे. केवळ 2022 बद्दल बोलायचे झाले तर एकूण 36 कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून 62,000 कोटी रुपये उभे केले आहेत.

आज केफीन टेक्नोलॉजीजचा (KFin Technologies) आयपीओ खुला झाला आहे आणि 20 डिसेंबरला एलिन इलेक्ट्रॉनिक्सचा (Elin Electronics) आयपीओ लाँच होईल.

केफीन टेक्नोलॉजीज (KFin Technologies) :

केफीन टेक्नोलॉजीजचा (KFin Technologies) आयपीओ आज खुला झाला आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी बाजारातून 1500 कोटी रुपये उभारणार आहे. आयपीओची किंमत 347-366 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.

हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल आहे म्हणजेच या अंतर्गत कोणतेही नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत. केवळ कंपनीचे प्रमोटर्स त्यांचे शेअर्स विक्रीसाठी ठेवतील. तुम्ही यामध्ये 21 डिसेंबर 2022 पर्यंत गुंतवणूक करू शकता. केफिन टेक्नॉलॉजीज फायनांशियल सर्व्हिस प्रोवाइड करते.

एलिन इलेक्ट्रॉनिक्स (Elin Electronics) :

एलिन इलेक्ट्रॉनिक्स (Elin Electronics) ही इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आहे. एलिन इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अनेक प्रमुख ब्रँडसाठी दिवे, पंखे आणि स्वयंपाकघरातील उपकरणे तयार करते.

त्याचा आयपीओ आज केवळ अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. तर उद्या अर्थात 20 डिसेंबर 2022 रोजी सगळ्यांसाठी आयपीओ खुला असेल. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून एकूण 475 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा प्राइस बँड 234-247 रुपये निश्चित करण्यात आला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT