वृद्ध पालकांचा आरोग्य विमा घेतला नाही तरी मिळेल तुम्हाला कर सवलतीचा लाभ! Sakal
अर्थविश्व

वृद्ध पालकांचा आरोग्य विमा घेतला नाही तरी मिळेल कर सवलतीचा लाभ!

वृद्ध पालकांचा आरोग्य विमा घेतला नाही तरी मिळेल तुम्हाला कर सवलतीचा लाभ!

सकाळ वृत्तसेवा

आयकर कायद्यात याची तरतूद करण्यात आली आहे.

जर तुम्ही तुमच्या वृद्ध आई- वडिलांचा आरोग्य विमा (Health Insurance) घेतला नसेल आणि त्यांच्या वैद्यकीय सुविधांवर दरवर्षी काही रुपये खर्च करत असाल, तर तुम्ही हा खर्च आयकर (Income Tax) कलम 80-डी मध्ये दाखवून देखील कर सूट (Tax Exemption) मिळवू शकता. आयकर कायद्यात याची तरतूद करण्यात आली आहे. (Even if you do not have health insurance for elderly parents, you will still get the benefit of tax relief)

बहुतेक नोकरदार मंडळी अनभिज्ञच

अनेक नोकरदार लोक काही कारणांमुळे वृद्ध आई- वडिलांसाठी आरोग्य विमा काढू शकत नाहीत. मात्र त्यांच्या किरकोळ आजारांवर, औषधे व इतर वैद्यकीय तपासण्यांवर दरवर्षी खर्च करावा लागतो. बरेच लोक त्यांच्या आयकर रिटर्नमध्ये (Income Tax Return) हा अतिरिक्त वैद्यकीय खर्च देखील दाखवत नाहीत. किंबहुना या खर्चाला प्राप्तिकरातूनही सूट मिळते, हेही त्यांना माहीत नाही.

आयकराचे कलम 80D नुसार...

प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 80D च्या तरतुदींनुसार, एखाद्या व्यक्तीला त्याच्या वृद्ध आई- वडिलांच्या (वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक) आरोग्यासाठी केलेल्या पेमेंटसाठी वार्षिक 50,000 रुपयांपर्यंत सूट मिळते. या देयकांमध्ये वार्षिक 50,000 रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा प्रीमियम आणि वैद्यकीय तपासणीसाठी वार्षिक 5,000 रुपयांपर्यंतचा समावेश आहे. तसेच, विमा न घेतल्यास वार्षिक 50,000 रुपयांपर्यंतचा वैद्यकीय खर्च ()Medical Expenses देखील त्यात समाविष्ट केला आहे.

येथे करू शकत नाही तुम्ही दावा

जर तुम्ही आधीच पालकांचा आरोग्य विमा काढला असेल तर तुम्ही अतिरिक्त वैद्यकीय खर्चासाठी कपातीचा दावा करू शकणार नाही. तथापि, एखादी व्यक्ती आरोग्य तपासणीसाठी वार्षिक पाच हजार रुपयांपर्यंत पेमेंटचा दावा करू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT