Share Market
Share Market Sakal
अर्थविश्व

शेअर बाजारात आज अस्थिरता अपेक्षित, तज्ज्ञांचे मत

शिल्पा गुजर

ऑक्टोबर एक्सपायरीच्या आधी नफावसुलीने बुधवारी बाजारात वर्चस्व गाजवले.

ऑक्टोबर एक्सपायरीच्या आधी नफावसुलीने बुधवारी बाजारात वर्चस्व गाजवले. शेवटच्या तासात, निफ्टी आणि बँक निफ्टीमधील घसरण जास्त वाढली. निफ्टी 57 अंकांनी घसरून 18,211 वर बंद झाला, तर बँक निफ्टी 364 अंकांनी घसरला. वास्तविक, अॅक्सिस बँकेच्या निकालामुळे बाजाराची स्थिती बिघडली. बँक निफ्टी 40,874 वर बंद झाला. धातू, बँकिंग, ऊर्जा शेअर्समध्ये विक्री झाली. ऑटो आणि पीएसई शेअर्सवरही दबाव राहिला. मात्र, आयटी, फार्मा, एफएमसीजी शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.

सेन्सेक्स 207 अंकांनी घसरून 61,143 वर बंद झाला. निफ्टी बँक 364 अंकांनी घसरून 40,874 वर बंद झाला. निफ्टी 57 अंकांनी घसरून 18,211 वर बंद झाला. त्याच वेळी, मिडकॅप 24 अंकांनी वाढून 31,126 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 16 शेअर्स घसरले. निफ्टीचे 50 पैकी 27 शेअर्स घसरले. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 8 शेअर्सवर दबाव दिसला.

आज कशी असेल शेअर बाजारातील स्थिती ?

पुढच्या ट्रेडिंग सत्रात जर निफ्टी 18,099 च्या खाली घसरला तर त्यात आणखी निचांकी घसरण दिसू शकते असे Chartviewindia.in चे मजहर मोहम्मद म्हणाले. या स्थितीत निफ्टी 17,968 च्या दिशेने जाताना दिसत असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे, जर निफ्टी 18,342 च्या वर राहिला तर तो 18,468 च्या दिशेने जाताना दिसेल. 28 ऑक्टोबरचा दिवस संपण्यापूर्वी बाजारात अस्थिरता असेल. बाजारामध्ये तटस्थ राहणे ही आजची अर्थात गुरुवारची योग्य रणनीती असेल असेही मजहर मोहम्मद म्हणाले.

मासिक एक्स्पायरी लक्षात घेता गुरुवारी शेअर बाजारात अस्थिरता अपेक्षित आहे, असे इक्विटी 99 चे राहुल शर्मा म्हणाले. याशिवाय, मंगळवारी IRCTC स्टॉक स्प्लिटची एक्स डेट आहे, ज्यामध्ये नुकतीच मोठी तेजी आली होती. गुरुवारच्या व्यापारात स्टॉप लॉस आणि टार्गेट या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला व्यापाऱ्यांनी दिला आहे. यासोबतच शेअर बाजार घसरल्यावर चांगले शेअर्स खरेदी करण्याचा सल्लाही शेअर बाजार तज्ज्ञांनी दिला आहे.

निफ्टीला 18,160 वर सपोर्ट दिसत असल्याचेही शर्मा म्हणाले. त्यानंतर पुढील सपोर्ट 18,050 वर आहे. जर ही पातळी तुटली तर निफ्टी 17,950 च्या दिशेने जाऊ शकतो. त्याच वेळी, 18,280 वर निफ्टीला रझिस्ट्ंस दिसत आहे. ही पातळी वरच्या दिशेने तुटल्यास निफ्टी 18,350-18,400 पर्यंत जाऊ शकतो असेही शर्मा म्हणाले.

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

- एमफॅसिस (MPHASIS)

- कॅनरा बँक (CANBK)

- ग्रामीण विद्युकरण निगम लिमिटेड (RECLTD)

- एल अँड टी टेक्नोलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड (LTTS)

- यूनायटेड ब्रुअरीज (UBL)

- एशियन पेन्ट्स (ASIANPAINT)

- युनायटेड फॉस्फरस लिमिटेड (UPL)

- डिविस लेबोरेटोरीज (DIVISLAB)

- एसबीआय लाइफ़ इंश्युरंस कंपनी लिमिटेड (SBILIFE)

- सिप्ला (CIPLA)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 DC vs LSG Live Score: अर्धा संघ माघारी परतला, पण पुरनची एकाकी झुंज; अवघ्या 20 चेंडूत झळकावलं अर्धशतक

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

Table Tennis: मनिका बत्राने रचला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी बनली पहिलीच भारतीय महिला टेबल-टेनिसपटू

PM Modi: ना घर, ना जमीन; पंतप्रधान मोदींची किती आहे संपत्ती? शपथपत्रातून आलं समोर

IND W vs SA W: भारत दौऱ्यावर येणार दक्षिण आफ्रिका संघ! BCCI ने केली शेड्युलची घोषणा, पाहा कधी आणि केव्हा होणार सामने

SCROLL FOR NEXT