Digital Rupee sakal
अर्थविश्व

FD On Digital Rupee : डिजिटल रुपीमध्ये FD करता येऊ शकते का? वाचा काय आहे RBI नियम

आरबीआयने डिजिटल रुपया भारतीय चलनाच्या बरोबरीने जारी केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारतीय रिझर्व्ह बँकेने 1 डिसेंबर रोजी डिजिटल रुपया लाँच केला आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार दुकानांपासून बँकांपर्यंतच्या व्यवहारांसाठी ई-रुपी वापरता येईल. हा डिजिटल रुपया भारतीय चलनाच्या बरोबरीने आरबीआयने जारी केला आहे.

हे पूर्णपणे कायदेशीर चलन आहे. डिजिटल रुपया डिजिटल टोकन म्हणून काम करतो. रिझर्व्ह बँक सध्या डिजिटल रुपयाच्या वितरण आणि किरकोळ वापर कसा केला जाईल यावर काम करत आहे.

हेही वाचा : द वॉल ढासळतेय का?

डिजिटल रुपयावर व्याज मिळणार नाही. ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवलेल्या पैशांवर तुम्हाला व्याज मिळत नाही, त्याचप्रमाणे डिजिटल वॉलेटमध्ये असलेल्या डिजिटल पैशावर तुम्हाला व्याज मिळणार नाही.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, क्यूआर कोड स्कॅन करून डिजिटल रुपयानेही पेमेंट केले जाऊ शकते. आरबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिजिटल रुपीचा वापर बँकेच्या वॉलेट आणि मोबाईल अॅप आणि बँकेने जारी केलेल्या इतर सुविधांच्या अंतर्गत केला जाईल. बँकेत जमा केलेला डिजिटल रुपया हा भारतीय चलनाइतकाच वैध असेल.

भविष्यात डिजिटल रुपयाचे आणखी काही फॉरमॅटही सादर केले जातील. डिजिटल रुपयाचा वापर रोख पैशा प्रमाणेच केला जाऊ शकतो आणि त्यात गुंतवणूक करून नफा मिळवता येतो.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी 13 डिसेंबर 2022 रोजी राज्यसभेत एक विधान केले की, डिजिटल रुपया वॉलेटद्वारे हस्तांतरित केला जाऊ शकतो. मात्र सध्या त्यावर व्याज मिळू शकत नाही. येत्या काळात या विषयावर विचार केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT