Mukesh Ambani Gautam Adani esakal
अर्थविश्व

Gautam Adani : टॉप-10 मधून बाहेर गेलेले अदानी पुन्हा श्रीमंतांच्या यादीत; अंबानींची आणखी एका स्थानाने घसरण!

अमेरिकेची संशोधन संस्था हिंडनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानी यांच्या साम्राज्याला मोठा हादरा बसला होता.

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकन इन्व्हेस्टमेंट रिसर्च फर्म आणि शॉर्ट सेलर हिंडनबर्गनं गौतम अदानी यांना काल (मंगळवार) ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीतून वगळलं होतं.

Gautam Adani News : अमेरिकेची संशोधन संस्था हिंडनबर्गच्या (Hindenburg Report) अहवालानंतर गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या साम्राज्याला मोठा हादरा बसला होता. श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानी असलेले गौतम अदानी टॉप-10 मधूनच बाहेर फेकले गेले होते.

अमेरिकन इन्व्हेस्टमेंट रिसर्च फर्म आणि शॉर्ट सेलर हिंडनबर्गनं गौतम अदानी यांना काल (मंगळवार) ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीतून वगळलं होतं. मात्र, आज पुन्हा अदानी टॉप-10 यादीत परतले आहेत. मात्र, यावर्षी सर्वाधिक संपत्ती गमावणाऱ्या श्रीमंतांमध्ये अदानी हे पहिल्या क्रमांकावर आहेत.

अदानींनी कार्लोस स्लिमला टाकलं मागं

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या (Bloomberg Billionaires Index) ताज्या अहवालात गौतम अदानी आता कार्लोस स्लिमला मागं टाकत 11 व्या स्थानावरून 10 व्या स्थानावर पोहोचले आहेत. त्यांच्या खालोखाल कार्लोस स्लिमचा क्रमांक लागतो, तर अंबानी एका स्थानाच्या नुकसानासह 13 व्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती 81.5 अब्ज आहे. तर अदानींची संपत्ती 86.4 अब्ज आहे.

मुकेश अंबानी पोहोचले 13 व्या स्थानावर

गेल्या वर्षी जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत केवळ मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ झाली होती. मागील वर्षी कमाईतही अदानी पहिल्या क्रमांकावर होते. या वर्षी मुकेश अंबानी ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या टॉप-10 अब्जाधीशांपैकी 13 व्या स्थानावर पोहोचले आहेत.

DMart च्या दमाणींचंही मोठं नुकसान

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी या वर्षी संपत्तीच्या नुकसानीच्या बाबतीत जगातील अब्जाधीशांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी आतापर्यंत 36 अब्ज गमावले आहेत. त्यांच्यानंतर रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा नंबर लागतो. या वर्षात अंबानींचं आतापर्यंत 5.59 अब्ज डॉलरचं नुकसान झालंय. तर, तिसऱ्या क्रमांकावर DMart चे राधाकृष्ण दमाणी आहेत. त्यांचं 2.51 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT