Adani Group Sakal
अर्थविश्व

Gautam Adani : LIC ने अदानी समूहामधील गुंतवणूकबाबत घेतला मोठा निर्णय; कंपनीतील गुंतवणूक...

LIC कडून गौतम अदानींबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

LIC Update on Gautam Adani : एलआयसीकडून गौतम अदानीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. हिंडेनबर्ग रिपोर्टने जाहीर केलेल्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

या सगळ्यात एलआयसीने आपले मौन सोडले असून आपण आपली गुंतवणूक कमी करणार नसल्याचे सांगितले आहे.

एलआयसीच्या अधिकाऱ्याने खुलासा केला :

माहिती देताना एलआयसीने अदानी समूहातील गुंतवणूक कमी करणार नसल्याचे म्हटले आहे. ही गुंतवणूक आहे तशीच ठेवली जाईल आणि त्यात कोणतीही कपात केली जाणार नाही. देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीचे अध्यक्ष एम.आर. कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

अदानी ग्रुप मॅनेजमेंटचे बिझनेस प्रोफाईल जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांना बोलवून घेऊ असे एलआयसीचे अध्यक्ष म्हणाले. यासोबतच ग्रुपमध्ये कोणत्या योजनांवर काम केले जात आहे, त्यांचे व्यवस्थापन कसे केले जात आहे, याची माहिती वेळोवेळी मिळणार आहे.

संकटकाळात दिलासा देणारी बाब :

संकटकाळात अदानी समूहासाठी हा मोठा दिलासा आहे. त्याच वेळी, यापूर्वी असे वृत्त आले होते की, एलआयसीचे अधिकारी अदानी समूहाच्या उच्च व्यवस्थापनासोबत बैठक घेतील आणि समूहाच्या व्यवसायाची चौकशी करतील. यासोबतच अशा प्रसंगांना तोंड देण्यासाठी काय करायला हवे यावरही चर्चा करणार आहोत.

स्टॉक्समध्ये अजूनही मोठ्या घसरणीचे वर्चस्व :

आज अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. ग्लोबल इंडेक्स ऑपरेटर एमएससीआयच्या निर्णयानंतर अदानी समूहाचे शेअर्स पुन्हा कोसळले आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

आज कंपनीच्या शेअरमध्ये लोअर सर्किट पाहायला मिळत आहे. आज बाजार उघडल्यानंतर अदानी एंटरप्रायझेसचा स्टॉक 10 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. दुपारी 1 वाजता कंपनीचा शेअर 1,920.35 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT