Adani NDTV Deal Sakal
अर्थविश्व

Adani NDTV Deal : प्रणय-राधिका रॉय यांना अदानींवर विश्वास; म्हणाले आता पत्रकारितेची मूल्य...

NDTV मधील बहुतांश शेअर्स AMG मीडिया नेटवर्कला विकण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Adani NDTV Deal : नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड (NDTV) चे संस्थापक प्रणय रॉय आणि राधिका रॉय NDTV मधील त्यांचे जवळपास सर्व शेअर्स (27.26%) अदानी समूहाकडे हस्तांतरित करतील. यानंतर त्यांच्याकडे फक्त 5% हिस्सा शिल्लक राहील.

शुक्रवारी त्यांनी एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. हस्तांतरणामुळे अदानी समूहाचा हिस्सा सध्याच्या 37.45% वरून 64.72% पर्यंत वाढेल.

राधिका-प्रणय म्हणाले की, त्यांनी 1988 मध्ये चांगल्या दर्जाची पत्रकारिता करण्यासाठी NDTV ची सुरुवात केली. परंतु ती वाढण्यास आणि त्याचा प्रसार होण्यास प्रभावी साधन आवश्यक होत.

ते म्हणाले की, 34 वर्षांनंतर त्यांचा विश्वास आहे की एनडीटीव्ही ही एक संस्था आहे ज्याने त्यांच्या अनेक आशा आणि आदर्श पूर्ण केले आहेत.

NDTV

राधिका-प्रणयने यांनी सांगितले की, ओपन ऑफरनंतर AMG मीडिया नेटवर्क आता एनडीटीव्हीमधील सर्वात मोठे शेअरहोल्डर आहेत. आम्ही NDTV मधील आमचे बहुतांश शेअर्स AMG मीडिया नेटवर्कला विकण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

ओपन ऑफर लाँच झाल्यापासून गौतम अदानी यांच्याशी त्यांची चर्चा सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

अदानीकडून मूल्ये राखणे अपेक्षित आहे :

राधिका-प्रणय यांनी सांगितले की, गौतम अदानी यांनी त्यांच्या सर्व सूचना सकारात्मक आणि मोकळेपणाने स्वीकारल्या आहेत.

गौतम अदानी यांनी विश्वास, विश्वासार्हता आणि स्वातंत्र्य असलेल्या ब्रँडमध्ये गुंतवणूक केली आहे आणि आम्हाला आशा आहे की, ते या मूल्यांचे पालन करतील. अदानी समूहाने ऑगस्टमध्ये NDTV मधील 29.18% हिस्सा खरेदी केला होता.

अदानी समूह हा NDTV मधील सर्वात मोठा शेअरहोल्डर :

या महिन्याच्या सुरुवातीला खुल्या ऑफरनंतर अदानी समूह मीडिया कंपनी न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड (NDTV) चा सर्वात मोठा भागधारक बनला. अदानी समूहाने ओपन ऑफरद्वारे नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेडमधील आपली हिस्सेदारी 37 टक्क्यांहून अधिक वाढवली होती.

अदानी समूह NDTV मधील 26 टक्के हिस्सा घेण्याचा विचार करत होता, परंतु खुल्या ऑफरने केवळ 5.3 दशलक्ष शेअर देऊ केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT