give up tea and invest amount in mutual funds
give up tea and invest amount in mutual funds सकाळ
अर्थविश्व

चहा सोडा आणि कोट्यधीश व्हा, कसं जाणून घ्या…

शिल्पा गुजर

चहा आरोग्यासाठी चांगला नाही, तरीही सगळ्यांच्या सकाळची सुरुवात ही चहानेच होते, शिवाय संध्याकाळीही नित्यनेमाने चहा घेतला जातो. मधल्या वेळेतही चहा होतोच. कुणी भेटलं की चहा, अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी चहा होतोच... बरं घरात चहा म्हणजे, दुध, साखर, चहापत्ती आलीच. आपल्या आरोग्यावर तसेच खिशावर परिणाम करणाऱ्या अशा सवयी आपण का सोडू शकत नाही?

आता सध्या एक कप चहा किमान 10 रुपयांना मिळतो. देशातले बरेचसे लोक दिवसातून दोनदा चहा पितात. म्हणजेच रोज किमान 20 रुपये चहावर खर्च होतात. काही लोक तर दिवसातून अनेक वेळा चहा पितात.

चहा सोडा कोट्यधीश व्हा !
चहा पिणे बंद केले तर आरोग्यासोबतच कोट्यधीश होता येतं, खोटं वाटतंय का तुम्हाला ? आम्ही खरंच सांगतोय. जर तुम्ही चहावर खर्च केलेली रक्कम वाचवली तर त्यातून तुम्ही कोट्यधीश होऊ शकता. कसे ते सविस्तर जाणून घ्या

दररोज दोन कप चहा प्यायलात तर किमान 20 रुपये लागतात. म्हणजेच एका महिन्यात 600 रुपये खर्च होतो. हेच पैसे वाचवून तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 10 कोटी रुपये जमा करू शकता. आश्चर्य वाटतंय ना…

यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडाची माहिती असणे आवश्यक आहे. चहा पिणे सोडून तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) करू शकता. म्युच्युअल फंडांनी लाँग टर्ममध्येच चांगला परतावा दिला आहे आणि लोकांना कोट्यधीश बनवले आहे. काही फंडांनी 20 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

20 वर्षाच्या तरुणाने चहाची सवय सोडून SIP मध्ये 40 वर्षे (480 महिने) सतत 20 रुपये जमा करून 10 कोटींहून अधिक रक्कम उभारली जाऊ शकते. या गुंतवणुकीवर सरासरी 15% वार्षिक परतावा दिल्यास 40 वर्षांनंतर एकूण निधी 1.88 कोटी रुपये होतो. या 40 वर्षांमध्ये महिन्याला 600 रुपयांच्या SIP वर 20 टक्के परतावा मिळत असेल, तर 40 वर्षांनंतर एकूण 10.21 कोटी रुपये जमा होतील.

म्युच्युअल फंडामध्ये चक्रवाढ व्याज मिळाल्याने, अगदी लहान गुंतवणूक मोठा फंड बनतो. मग कधी सोडताय चहा ?

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT