Gold Silver Rate esakal
अर्थविश्व

Gold Rate : सोन्याच्या दरात घसरण सुरूच; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

सोन्यामध्ये गुंतवणूक करणे ही महत्वाची गुंतवणूक समजली जाते.

सकाळ डिजिटल टीम

आंतरराष्ट्रीय बाजार आणि भारतीय बाजारात आज म्हणजेच, सोमवारी 19 डिसेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून महागाई मोजण्यासाठी सोन्याच्या किंमती हे एक मानक आहे असं आपण मानतो. सोन्यामध्ये गुंतवणूक करणे ही महत्वाची गुंतवणूक समजली जाते. कारण त्यातून चांगला परतावा मिळतो.

आज 22 कॅरेटचा 10 ग्रॅम सोन्याचा दर 49,750 तर 24 कॅरेटचा 54,260 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 695 रुपये आहे. (gold silver price update 19 December 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 55,160 रुपये

  • दिल्ली - 54,260 रुपये

  • हैदराबाद - 54,110 रुपये

  • कोलकत्ता - 54,110 रुपये

  • लखनऊ - 54,260रुपये

  • मुंबई - 54,110 रुपये

  • नागपूर - 54,110 रुपये

  • पुणे - 54,110 रुपये

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT