Check Today's Gold Silver Price Updates
Check Today's Gold Silver Price Updates esakal
अर्थविश्व

Gold Price Update: सोनं झालं स्वस्त; काय आहेत नव्या किंमती, जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Gold Price Update: तुम्हाला सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सोने सध्या त्याच्या इतिहासातील सर्वोच्च दरापेक्षा 6000 रुपये रुपये स्वस्त दरात विकले जात आहे. सोन्याचा आजचा दर (Gold Rate) सध्या 48900 रुपये आणि चांदी (Silver) 63500 रुपये आहे.

आजपासून नवीन व्यावसायिक सप्ताह सुरू होत आहे. आज नवीन ट्रेडिंग आठवड्याचा पहिला दिवस आहे. याआधी गेल्या आठवड्यात सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही किंचित वाढ झाली होती. परंतु या आठवड्यात सोन्या-चांदीची वाटचाल कशी होते, याकडे सर्वांचं लक्ष असेल.

शनिवार आणि रविवारी दर जाहीर होत नाहीत-

इंडियन बुल अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) सुट्टीमुळे शनिवार आणि रविवारी सोने आणि चांदीचे दर जाहीर करत नाही. या आठवड्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोने प्रति 10 ग्रॅम 139 रुपयांनी स्वस्त झाले, तर चांदी प्रति किलो 278 रुपयांनी स्वस्त झाली. मात्र, सराफा बाजारातील जाणकारांच्या मते सोन्या-चांदीच्या दरातील तेजीचा कल कायम राहू शकतो.

शुक्रवारी सोने 137 रुपयांनी स्वस्त होऊन 49972 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले. याआधी गुरुवारी सोन्याचा भाव 50109 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. तर चांदी 278 रुपयांनी स्वस्त होऊन 63507 रुपये प्रति किलोवर बंद झाली. तत्पूर्वी गुरुवारी चांदीचा भाव 63785 प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला.

14 ते 24 कॅरेट सोन्याच्या नव्या किंमती-

शुक्रवारी 24 कॅरेट सोने 137 रुपयांनी स्वस्त होऊन 49972 रुपये, 23 कॅरेट सोने 136 रुपयांनी स्वस्त होऊन 49772 रुपये, 22 कॅरेट सोने 126 रुपयांनी स्वस्त होऊन 45774 रुपये, 18 कॅरेट सोने 105 रुपयांनी स्वस्त 37479 रुपये आणि 14 कॅरेट सोने 80 स्वस्त होऊन 29234 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला.

सोने 6091 आणि चांदी 16195 आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा स्वस्त-

सोने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा प्रति 10 ग्रॅम 6091 रुपये स्वस्त झाले आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. त्याच वेळी, चांदी त्याच्या सर्वोच्च स्तरावरून सुमारे 16195 रुपये प्रति किलो दराने स्वस्त होत आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो आहे.

अशा प्रकारे जाणून घ्या सोन्याची शुद्धता-

आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. बीआयएस केअर अ‍ॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.

मिस्ड कॉल देऊन अशा प्रकारे सोन्याची नवीन किंमत (Latest price of gold) जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर (Retail rates) जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासह, वारंवार अपडेट्सबद्दल माहितीसाठी तुम्ही www.Ibja.Co ला भेट देऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दमदार सुरुवातीनंतर दिल्लीला दोन मोठे धक्के! फ्रेझर-मॅकगर्कनंतर शाय होपही बाद

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT