gold main.jpg
gold main.jpg 
अर्थविश्व

Gold Price: सोन्याच्या भावात मोठी घसरण, चांदी चमकली; जाणून घ्या दर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली- सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. बुधवारनंतर गुरुवारीही बाजार बंद होताना सोन्याच्या दरात घसरण झाली होती. मागील दोन महिन्यांत सोने 3000 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त झाले आहे. तर ऑगस्ट 2020 च्या विक्रमी दराशी तुलना करता सोन्याच्या भावात 10000 हजारांची घसरण झाली आहे. 

गुरुवारी जागतिक बाजारात विक्रीकडे कल वाढला असताना देशाची राजधानी दिल्लीत सराफा बाजारात सोन्याचे दर 358 रुपयांनी कमी होऊन 45959 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके झाले. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. मागील सत्रात सोने 46313 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. 

दुसरीकडे चांदीच्या दरात 151 रुपयांची तेजी दिसून आली. चांदीचा दर 69159 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला. आदल्या दिवशी 69008 या किंमतीवर बाजार बंद झाला होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे तज्ज्ञ (कमोडिटी) तपन पटेल म्हणाले की, जागतिक स्तरावर सोन्याच्या विक्रीनुसार, दिल्लीतील 24 कॅरेट सोन्याच्या हजर किंमतीत 358 रुपयांनी घसरण झाली. तर चांदीची किंमत 151 रुपयांच्या तेजीसह 69159 रुपये प्रति किलो झाली. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने घसरणीसह 1792 डॉलर प्रति औंस आणि चांदी किरकोळ घसरणीसह 27.56 डॉलर प्रति औंसवर व्यवहार सुरु होता. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडच्या (आयबीजेए) रेटवर नजर टाकल्यास आज सोन्याचे दर अशापद्धतीने आहेत (हे दर 10 ग्रॅमवर विना जीएसटी)

999 (शुद्धता) - 46838
995- 46650
916 - 42904
750 - 35129
585 - 27400

चांदी 999 - 69226
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT