gold update esakal
अर्थविश्व

Gold Price: दिवाळी काही दिवसावर असताना सोनं महागलं! जाणून घ्या नवे दर

आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे

सकाळ डिजिटल टीम

मागील आठवड्यात सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून आली होती. वीकेंडला तर सोने चांदीचे दरात घसरण दिसून आली. मात्र आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे तर चांदीचे दर मात्र स्थिर आहे. दिवाळी खरेदीसाठी हा महत्त्वाचा आठवडा आहे. त्यामुळे सोने खरेदीत वाढ होणे अपेक्षित होते.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,450 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,670 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 553 रुपये आहे. (gold silver price update 17 october 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 51,160 रुपये

  • दिल्ली - 50,820 रुपये

  • हैदराबाद - 50,670 रुपये

  • कोलकत्ता - 50,670 रुपये

  • लखनऊ - 50,820 रुपये

  • मुंबई - 50,670 रुपये

  • नागपूर - 50,700 रुपये

  • पुणे - 50,700 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT