gold silver rate Sakal
अर्थविश्व

Gold Silver Price: नवरात्रीच्या तोंडावर सोनं घसरले! जाणून घ्या आजचे नवे दर

आजही सोने चांदीच्या दरातील घसरण कायम आहे.

सकाळ डिजिटल टीम

आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. मध्यंतरी चांदीच्या दरात तेजी दिसून आली होती. मात्र पुन्हा चांदीचे भाव घसरले. शुक्रवारी सोने चांदीच्या दरात घसरण दिसून आली तर आजही सोने चांदीच्या दरातील घसरण कायम आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 45,800 रुपये तर 24 कॅरेट साठी 49,960 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 564 रुपये आहे. (gold silver price update 17 september 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

चेन्नई - 50,460 रुपये

दिल्ली - 50,460 रुपये

हैदराबाद - 50,120 रुपये

कोलकत्ता - 49,960 रुपये

लखनऊ - 50,120 रुपये

मुंबई - 49,960 रुपये

नागपूर - 49,980 रुपये

पूणे - 49,980 रुपये

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेसेनेला पुन्हा मोठा धक्का! महिनाभरात अजून एका बड्या नेत्याचं पद रद्द; राजकीय समीकरणं बदलणार

आता AI ठरवणार संघात कोणाला संधी मिळणार! क्रिकेटमध्ये तंत्रज्ञानाचा नवा अध्याय; आकडेवारीपासून थेट संघ निवडीसाठी वापर होणार

आनंद शिंदेंच्या आवाजातील 'गोमु सासरला जाते' गाण्याचा धुमाकूळ; 'भुतम भयम'मधील गावरान ठसक्यातील गाणं ऐकलंत का?

Latest Marathi News Live Update : तुळजाभवानी मंदीरातील पेड दर्शन बंद करण्याची मागणी

Vat Purnima 2026: घराजवळ वडाचं झाड नाहीये? मग 'अशी' करा घरच्या घरीच वटपौर्णिमेची पूजा; जाणून घ्या सोपा उपाय

SCROLL FOR NEXT