Gold-Silver Update
Gold-Silver Update sakal
अर्थविश्व

Gold-Silver Price: वीकेंडला सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

सकाळ डिजिटल टीम

Gold Silver Price Update: आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी आणि मंगळवारी सोन्याच्या दरात स्थिरता होती तर चांदीच्या दरात घसरण दिसून आली होती. त्यानंतर बुधवारपासून सोन्याच्या दरात सलग घसरण सुरू होती मात्र शुक्रवारी या घसरणीला ब्रेक लागला असून अखेर आठवड्याच्या शेवटी सोने चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,200 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,490 रुपये आहे तर10 ग्रॅम चांदीचा दर 580 रुपये आहे. सोने चांदीच्या दरात होणाऱ्या वाढीने विक्रीचा जोर मंदावलाय. (Gold silver price update 29 july 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

चेन्नई - 52,420 रुपये

दिल्ली - 51,560 रुपये

हैदराबाद - 51,490 रुपये

कोलकत्ता - 51,490 रुपये

लखनऊ - 51,660 रुपये

मुंबई - 51,490 रुपये

नागपूर - 51,570 रुपये

पूणे - 51,570 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli MIDC Blast Update: डोंबिवली अपघातस्थळी आणखी 3 मृतदेह सापडले, एकूण मृतांचा आकडा 11 वर

Share Market Today: शेअर बाजारातील विक्रमी वाढ कायम राहणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Rahul Gandhi : भाजपच्या दृष्टीने महिला दुय्यम;दिल्लीतील सभेत राहुल गांधींचे टीकास्त्र

Latest Marathi News Live Update: अंबादास दानवे डोंबिवली स्फोट दुर्घटनास्थळी

Malaysia Masters : दुसऱ्या फेरीत कोरियाच्या यू जिनविरुद्ध तीन गेममध्ये सिंधूचा संघर्ष

SCROLL FOR NEXT