gold Silver sakal
अर्थविश्व

Gold-Silver Price: गणेश चतुर्थीला सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

आज गणेश चतुर्थीनिमित्त सोने खरेदीवर भर दिसून येईल.

सकाळ डिजिटल टीम

Gold-Silver price: आठवड्याच्या सुरवातीपासून सोने चांदीत अस्थिरता दिसून येत आहे. मंगळवारी सोने चांदीच्या दरात घसरण दिसून आली होती तर आज सोन्याचे दर वाढले असून चांदीच्या दरात स्थिरता दिसून येत आहे. आज गणेश चतुर्थीनिमित्त सोने खरेदीवर भर दिसून येईल.

आज 22 कॅरेटसाठी सोन्याचा दर 47,250 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,540 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 540 रुपये आहे. (gold silver price update 27 august 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

चेन्नई - 52,250 रुपये

दिल्ली - 51,690 रुपये

हैदराबाद - 51,540 रुपये

कोलकत्ता -51,540 रुपये

लखनऊ - 51,690 रुपये

मुंबई - 51,540 रुपये

नागपूर - 51,570 रुपये

पूणे - 51,570 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: रेल्वे प्रवाशांसाठी बातमी! दिवाळीपूर्वी रेल्वेचा मोठा निर्णय; पुणे-हडपसरहून अमरावती, गाझीपूर, गोरखपूरसाठी विशेष गाड्या

अर्थबोध : प्राप्तिकर विभागाला तुमचे उत्पन्न कळू शकते का?

म्युच्युअल फंड : ‘कॉन्ट्रॅरियन इन्व्हेस्टिंग’मधील संधी

Maharashtra Weather : मॉन्सून परतीच्या वाटेवर! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा; पुणे-सातारा-कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

करकायदा : ‘एमडीआर’वरील जीएसटी

SCROLL FOR NEXT