Check Today's Gold Price Updates
Check Today's Gold Price Updates esakal
अर्थविश्व

अक्षय तृतीयेनंतर सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर

सकाळ डिजिटल टीम

Today's Gold Price Updates: अक्षय तृतीयेमुळे सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री झालेली दिसून आली. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार आज २२ कॅरेट साठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ४७,००० रुपये तर २४ कॅरेट साठी ५१,२८० रुपये आहे. चांदी ६२,७०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. गेल्या कित्येक दिवसापासून सोन्याच्या किमतीत चढ- उतार दिसून येत आहे. कालच्या तुलनेत सोन्याच्या किंमतीत आज किंचीत घट दिसून आली.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,२०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,५१० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,२८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,५९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,२८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,५९० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६२७ रुपये आहे.

बाजारात खऱ्यासोबतच बनावट सोनंही
सध्या बाजारात खऱ्यासोबतच बनावट सोनंही मोठ्या प्रमाणात मिळू लागलं आहे. अशा परिस्थितीत सोने खरेदी करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सोने खरेदी करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतल्यास बनावट सोने खरेदी करणे टाळता येते. चला तर मग आम्‍ही तुम्‍हाला सोन्याची शुद्धता तपासण्‍याच्‍या प्रक्रियेबद्दल जाणून घ्या, खरे किंवा खोटे सोने कसे तपासाल?

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT