Bank FD Rate sakal
अर्थविश्व

FD Interest Rates : 'या' बँकांच्या FD वर मिळतेय जबरदस्त व्याज; जाणून घ्या नवीन दर

खाजगी आणि सरकारी बँकांनी त्यांच्या मुदत ठेवींचे व्याजदर वाढवले ​​आहेत.

सकाळ डिजिटल टीम

FD Interest Rates : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात 0.35 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर, खाजगी आणि सरकारी बँकांनी त्यांच्या मुदत ठेवींचे व्याजदर वाढवले ​​आहेत. अनेक बँकांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात मोठी वाढ केली आहे.

सामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर अधिक व्याज मिळते. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), HDFC बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.

HDFC किती व्याज देते :

HDFC बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँक आता ज्येष्ठ नागरिकांना सात दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर 3.50 टक्के ते 7.50 टक्के व्याज देत आहे.

HDFC बँक ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक 7.75 टक्के व्याज देत आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन दर 14 डिसेंबरपासून लागू झाले आहेत. सामान्य गुंतवणूकदारांना पाच वर्षांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 7 टक्के व्याज मिळेल. दुसरीकडे, जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला 7.75% परतावा मिळेल.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

कॅनरा बँकेनेही केले बदल :

कॅनरा बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरातही वाढ केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नवीन दर 19 डिसेंबरपासून लागू झाले आहेत. बँक सात दिवसांपासून ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 3.25 टक्के ते 7.50 टक्के व्याज देत आहे.

ICICI बँकेने 2 कोटी रुपयांच्या FD वरील व्याजदरात 60 आधार अंकांनी वाढ केली आहे. FD वरील नवीन व्याजदर 16 डिसेंबर 2022 पासून लागू झाले आहेत. बँक आता सात दिवसांपासून ते 10 वर्षांच्या FD वर 3.5 टक्के ते 7.50 टक्के व्याज देत आहे.

एका दिवसापासून ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD मध्ये गुंतवणूक केली तर त्याला 6.90 टक्के दराने व्याज मिळेल. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के दराने व्याज मिळणार आहे.

स्टेट बँकेच्याही व्याजदरात वाढ :

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात 65 आधार अंकांची वाढ केली आहे. नवीन दर 23 डिसेंबरपासून लागू होणार आहेत.

आता सात दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 3.50 टक्के ते 7.25 टक्के व्याज मिळेल. स्टेट बँकेने 211 दिवसांपासून एका वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदर 5.50 टक्क्यांवरून 5.75 टक्के केला आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीतील एफडीवर ६.२५ टक्के दराने व्याज मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT