Share Market Sakal
अर्थविश्व

Share Market : 'हा' शेअर येत्या काळात देईल तगडा परतावा, आताच घेऊन ठेवा, तज्ज्ञांचा सल्ला...

शेअर बाजारात संयमाने चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर त्याचा नक्कीच फायदा होतो.

सकाळ डिजिटल टीम

Share Market : शेअर बाजारात संयमाने चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर त्याचा नक्कीच फायदा होतो. वुडपॅनल बनवणाऱ्या ग्रीनपॅनेल (Greenpanel) कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना कधीही निराश केलेले नाही.

पण सध्या त्यांचे शेअर्स एका वर्षाच्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरले असतानाही गुंतवणूकदार नफ्यात आहेत. अवघ्या तीन वर्षांत सुमारे या शेअर्समध्ये 778 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यात गुंतवणूक करून चांगला नफा मिळू शकतो, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म बीओबी कॅप्सने यामध्ये गुंतवणुकीसाठी 595 रुपयांचे टारगेट दिले आहे, जे सध्याच्या किंमतीपेक्षा 85% जास्त आहे. बीएसईवर त्याची सध्याची किंमत 320.95 रुपये आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

तीन वर्षांपूर्वी 25 ऑक्टोबर 2019 रोजी ग्रीनपॅनेलचे शेअर्स 36.55 रुपयांवर होते. आता ते 778.11 टक्क्यांच्या वाढीसह 320.95 रुपयांवर पोहोचले आहेत. यावर्षी 29 एप्रिल 2022 रोजी हे शेअर्स 625 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर होते. मात्र, त्यानंतर शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला आणि आठ महिन्यांत 49 टक्क्यांनी घसरला.

लाकूड पॅनेल तयार करणारी ग्रीनपॅनेल ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. याचे उत्तराखंड आणि आंध्र प्रदेशात प्लांट्स आहेत. या प्लांट्समध्ये मिडियम डेन्सिटी फायबरबोर्ड (MDF), प्लायवुड, डेकोरेटिव्ह व्हिनियर्स, फ्लोअरिंग आणि दरवाजे तयार करतात.

एमडीएफ बनवण्याच्या बाबतीत ग्रीनपॅनल ही कंपनी केवळ देशातच नाही तर आशिया खंडातील सर्वात मोठी कंपनी आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ममता बॅनर्जी कोलकाता हायकोर्टात दाखल, भवानीपूरच्या निकालाविरोधात दाखल केली याचिका, पश्चिम बंगालमध्ये घडामोडींना वेग

Fifa World Cup 2026 : स्पेन साखळी फेरीतच घरी जाणार? दुबळ्या केप व्हर्दे संघाने 'बरोबरी'त रोखल्याने माजी विजेत्यांचे समीकरण बिघडले

‘हे गाणं प्रेग्नेंसीत रेकॉर्ड केलं होतं’ परिणीती चोप्राचं 'नमामी शमीशान' शिवभक्ती गीत चर्चेत, सोशल मीडियावर Viral Video

Latest Marathi News Live Update : शिवसेना अधिक बळकट होणार असल्याचा दीपक केसरकर यांचा दावा

पुनर्वसनावरून केडीएमसी महासभेत खडाजंगी! "आमदारांसाठी एक आणि नगरसेवकांसाठी दुसरा नियम आहे का?" भाजप नगरसेवकांचा सवाल

SCROLL FOR NEXT