Share Market Updates sakal
अर्थविश्व

या पेंट कंपन्यांकडून मिळतोय खात्रीशीर दमदार परतावा...

गेल्या काही वर्षांत पेन्ट्स कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांचा पैसा अनेक पटीने वाढवला आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही वर्षांत पेन्ट्स कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांचा पैसा अनेक पटीने वाढवला आहे.

शेअर बाजारात पैसे कमावयचे असतील तर तुम्हाला दमदार शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करावे लागतील. त्यासाठी तज्ज्ञ, ब्रोकरेज हाऊसच्या साथीने आम्ही तुम्हाला मदत करत असतो. गेल्या काही वर्षांत पेन्ट्स कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांचा पैसा अनेक पटीने वाढवला आहे. यामध्ये एशियन पेंट्स, बर्जर पेंट्स आणि कानसाई पेंट्सचा समावेश आहे.

एका इंग्रजी वेबसाईट्सने याबबात विश्लेषण केले आहे, ज्यातून ही माहिती समोर आली आहे. या विश्लेषणातून समजते आहे की, गेल्या 15 वर्षांत (जून 2007-जून 2022) या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवलेले पैसे दर तीन वर्षांनी जवळजवळ दुप्पट झाले आहेत. गेल्या 15 वर्षांतील या कंपन्यांच्या शेअर्सच्या रोलिंग रिटर्न्सच्या आधारे आम्ही ही माहिती सांगत आहोत,.

रोलिंग रिटर्न ही एका निश्चिक कालावधीत कंपनीच्या स्टॉकचा परतावा निश्चित करण्याची एक पद्धत आहे. या तीन कंपन्यांपैकी बर्जर्स पेंट्सच्या (Bergers paints) शेअर्सनी सर्वाधिक तीन वर्षांचा रोलिंग परतावा दिला आहे. 3,716 दिवसांपैकी 2,470 दिवस म्हणजे सुमारे 70 टक्के, या स्टॉकचा परतावा 100 टक्क्यांहून अधिक आहे.

एशियन पेंट्सच्या बाबतीत, हा परतावा 60 टक्के आहे, तर कानसाई नेरोलॅक पेंट्सच्या बाबतीत तो 50 टक्के आहे. जर आपण संपूर्ण 15 वर्षांच्या परताव्याबद्दल बोललो तर बर्जर पेंट्सने 3,244 टक्के परतावा दिला आहे. 15 वर्षांत एशियन पेंट्सचा परतावा 3,038 टक्के आहे. कानसाई नेरोलॅक पेंट्सचा (Kansai Nerolac Paints) परतावा 1,006 टक्के आहे. या काळात निफ्टी 261 टक्क्यांनी वधारला आहे.

पण गेल्या 15 वर्षांत पेंट इंडस्ट्री खूप बदलली आहे. अनेक नवीन कंपन्या बाजारात आल्या आहेत. त्यामुळे पडून असलेल्या या तिन्ही कंपन्यांच्या मार्केट शेअरमध्ये घसरण झाली आहे. हाय इन्पुट कॉस्टमुळे कंपन्यांच्या प्रॉफिट-मार्जिनवरही दबाव आला आहे.

एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये बुधवारी कमजोरी दिसून आली. एनएसईवर, तो दुपारी 0.76 टक्क्यांनी घसरून 2,658 रुपयांवर व्यवहार करत होता. बाजारातील घसरणीचा फटका या स्टॉकलाही बसला आहे. यंदा हा स्टॉक 22 टक्क्यांनी घसरला आहे.

कन्साई नेरोलॅकचा शेअर दुपारी 0.37 टक्क्यांनी घसरून 373 रुपयांवर व्यवहार करत होता. यवर्षी हा स्टॉक 37 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. तर बर्जर पेंट्सचा शेअर 0.64 टक्क्यांनी घसरून 580 रुपयांवर व्यवहार करत होता. यावर्षी हा स्टॉक 25 टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT