Money 
अर्थविश्व

चालू आर्थिक वर्षात भारताच्या दरडोई उत्पन्नात किती होणार घट; वाचा सविस्तर

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - ‘कोविड-१९’ च्या साथीचा परिणाम आता दरडोई उत्पन्नावरही होण्याचा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षात भारताच्या दरडोई उत्पन्नात ५.४ टक्‍क्‍यांची घट होण्याची शक्‍यता स्टेट बॅंकेच्या आर्थिक शाखेने व्यक्त केली आहे. एकूण देशांतर्गत उत्पादनातील (जीडीपी) सर्वसाधारणपणे होणाऱ्या ३.८ टक्‍क्‍यांच्या घसरणीपेक्षा दरडोई उत्पन्नातील घट मोठी असेल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिल्ली, चंडीगड आणि गुजरात या राज्यांत दरडोई उत्पन्नातील घट सर्वाधिक असेल. तेथे यावर्षी अनुक्रमे १५.४ टक्के, १३.९ टक्के आणि ११.६ टक्के घसरण होण्याची शक्‍यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे, अरूणाचल प्रदेश, गोवा आणि मणिपूर या राज्यांत दरडोई उत्पन्नातील घट सर्वांत कमी असेल.

देशपातळीवर विचार करता, चालू आर्थिक वर्षात म्हणजे २०२०-२१ मध्ये भारताच्या दरडोई उत्पन्नात ५.४ टक्‍क्‍यांची घट होऊन ते १.४३ लाख रुपयांवर येण्याची शक्‍यता आहे. गतवर्षी ते १.५२ लाख रुपये होते. ‘जीडीपी’तील सर्वसाधारण घसरणीपेक्षा (३.८ टक्के) ही घट जास्त राहण्याचा अंदाज आहे. स्टेट बॅंकेचे समूह मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्या कांती घोष यांनी ही बाब अहवालात नमूद केली आहे. 

भारताच्या ‘जीडीपी’मध्ये या राज्यांचा वाटा जवळजवळ ४७ टक्के आहे. हा सर्व प्रामुख्याने शहरी आणि रेड झोनमधील परिसर असल्याने तेथे अधिक कडक स्वरुपात लॉकडाउनची अंमलबजावणी होत होती. बाजारपेठा, व्यापारी संकुले आणि मॉल बंद असल्याचा परिणाम तेथील उत्पन्नावर होत आहे. आता टप्प्याटप्प्याने तेथील बाजारपेठा सुरू होत असल्या तरी नेहमीपेक्षा ग्राहकांची संख्या ७०-८० टक्‍क्‍यांनी कमी असल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे.

यांना सर्वाधिक फटका
दिल्ली, चंडीगड आणि गुजरात
यांना कमी फटका
अरुणाचल प्रदेश, गोवा आणि मणिपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT