IBPS Recruitment 2022 Notification, Bank Jobs Notification | Bank Job News | Government Job News
IBPS Recruitment 2022 Notification, Bank Jobs Notification | Bank Job News | Government Job News  
अर्थविश्व

IBPS Recruitment 2022: आयबीपीएसच्या विभाग प्रमुख पदासाठी भरती, मिळणार 25 लाख पगार

सकाळ डिजिटल टीम

बँकेमध्ये सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनेल सिलेक्शन बोर्ड (IBPS) ने विभाग प्रमुख (Technology Support Services) पदासाठी भरती केली आहे. पदवी आणि पदव्युत्तर उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकता. आयपीएसच्या या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. यासाठी उमेदवार आयबीएसच्या ऑफिशिअर वेबसाईट ibps.in जाऊन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ एप्रिल २०२२ आहे. (IBPS Recruitment 2022 Notification)

महत्त्वाच्या तारखा

- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख - 24 मार्च 2022

- ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख - 13 एप्रिल 2022

- मुलाखतीची तारीख - एप्रिल 2022

किती पदांसाठी भरती?

IBPS ने विभाग प्रमुख (तंत्रज्ञान सहाय्य सेवा) च्या फक्त 1 पदासाठी भरती केली आहे. इच्छुक उमेदवारांना विनंती आहे की, त्यांनी लवकरात लवकर या पदासाठी अर्ज करावा.

किमान वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करण्यासाठी किमान वयोमर्यादा ६१ वर्षे असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन, संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि संगणक अनुप्रयोग यांसारख्या विषयांमध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया

या पदासाठी उमेदवारांची निवड IBPS च्यावतीने घेण्यात आलेल्या मुलाखतींच्या आधारे केली जाईल.

किती पगार मिळेल?

या पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला दरवर्षी 25 लाखपर्यंत पगार दिला जाईल.

असा करा अर्ज

1. उमेदवारांनी प्रथम IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी, ibps.in.

2. त्यानंतर तुम्ही अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

3. आता तुम्ही अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या भरा.

4. त्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

5. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रत प्रिंट करून ठेवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT