icici bank main.jpg 
अर्थविश्व

कोरोना काळातही ICICI बँकेच्या कमाईत 6 पट वाढ, तब्बल 4251 कोटी नेट प्रॉफिट

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- कोरोना काळातही आयसीआयसीआय बँकेच्या नफ्यात वाढ झाली आहे. बँकेने जुलै-सप्टेंबर तिमाहीची आकडेवारी जाहीर केली आहे. नेट प्रॉफिटमध्ये वार्षिक निव्वळ नफ्यात सहापट वाढ झाली आहे. सप्टेंबर तिमाहीमध्ये बँकेला 4251 कोटींचा फायदा झाला आहे. 2019 च्या सप्टेंबरमधील तिमाहीत बँकेला 655 कोटींचा लाभ झाला होता. 

नेट इंटरेस्ट इन्कम 16 टक्क्यांनी उसळला

नेट इंट्रेस्ट इन्कम म्हणजे NII मध्येही 16 टक्के तेजी आली आहे. सप्टेंबर तिमाहीत एनआयआय 9366 कोटी होता. तर 2019 च्या सप्टेंबर तिमाहीत हा 8057 कोटी होता.

एकूण ठेवीत 20 टक्क्यांची उसळी

बँकेच्या एकूण ठेवीतही वार्षिक आधारावर 20 टक्क्यांची तेजी आली आहे. 30 सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत बँकेचे एकूण डिपॉजिट 8 लाख 32 हजार 936 कोटी इतके होते. मुदत ठेवी 26 टक्क्यांची तेजी आली आहे. घरगुती कर्जात वार्षिक आधारावर 10 टक्क्यांची तर तिमाहीच्या आधारावर 4 टक्क्यांची तेजी आली आहे. 

रिटेल लोनमध्ये 13 टक्क्यांची तेजी


वार्षिक आधारावर रिटेल लोनमध्ये 13 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. तिमाहीच्या आधारावर यामध्ये 6 टक्क्यांची तेजी आली आहे. ऑटो लोन प्री कोविड स्तरावर पोहोचला आहे. लॉकडाऊनपासून दिलासा मिळाल्यानंतर दर महिन्याला कर्ज देण्याची प्रक्रियेने वेग घेतला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT