sip payment sakal
अर्थविश्व

Mutual Fund: SIP पेमेंट मिस झाल्यास काय होते? बँका दंड आकारतात का?

SIP मंथली पेमेंट मिस झाले तर बँक किंवा म्युच्युअल फंड हाऊसेस दंड आकारतात का?

सकाळ डिजिटल टीम

शेअर मार्केटमध्ये थेट गुंतवणुकीपेक्षा अनेक गुंतवणूकदार एसआयपीच्या माध्यमातून बाजारात गुंतवणूक करत आहेत. कारण, ही गुंतवणुकीची सर्वात सोयीची आणि चांगला परतावा देणारी पद्धत आहे. पण काही कारणामुळे जर सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचे (SIP) मंथली पेमेंट मिस झाले तर बँका किंवा म्युच्युअल फंड हाऊसेस दंड आकारतात का? याबाबत जाणून घेऊयात... (if sip monthly payment miss what happend bank or mutual fund will charge a penalty read story )

SIP पेमेंट मिस झाल्यास दंड ?

शक्य असल्यास तुम्ही एसआयपी पेमेंटटी तारीख मिस करु नका. कारण तुम्हाला कोणत्या तारखेला एसआयपी कापली जाणार आहे याची तारीख माहित असते, अशा वेळी खात्यात तेवढे पैसे शिल्लक ठेवली तर बऱ्यात गोष्टी सोप्या होतील. पण एखाद्या वेळी एसआयपी मिस झाली तर म्युच्युअल फंड हाऊस कोणताही दंड आकारत नाही. पण तुमची बँक दंड आकारते. दंडाची रक्कम 250 ते 500 रुपयांपर्यंत असू शकते.


एसआयपी पेमेंट अनेक वेळा मिस केल्यास काय होते ?

तुम्ही एकापेक्षा जास्त वेळा एसआयपी चुकवल्यास, दंडाची रक्कम वाढते. याचा थेट परिणाम तुमच्या म्युच्युअल फंडावर होतो. परिणामी, तुमचा परतावा कमी होतो. पण, एसआयपी पेमेंट सलग तिसऱ्यांदा चुकल्यास, म्युच्युअल फंड कंपनी तुमची एसआयपी बंद करते. या दरम्यान आत्तापर्यंत जमा केलेली रक्कम सुरक्षित राहते. पण तुम्ही एसआयपी पुढे चालू ठेवू शकणार नाही. जर तुम्ही एसआयपी पेमेंट करू शकत नसाल, तर तुम्ही म्युच्युअल फंड कंपनीला कळवून ते बंद करू शकता.

गुंतवणुकीबाबत शिस्त पाळा

गुंतवणूकदारांनी एसआयपी पेमेंट चुकण्यासारख्या परिस्थिती टाळल्या पाहिजेत असे तज्ज्ञ सांगतात. कारण त्याचा थेट परिणाम एसआयपीच्या परताव्यावर होतो. म्हणून, मासिक एसआयपीच्या तारखेपर्यंत बँक खात्यात पुरेशी रक्कम ठेवली पाहिजे. जर एसआयपी बंद असेल तर अशा परिस्थितीत गुंतवणूकदार ती पुन्हा सुरू करू शकत नाही. गुंतवणूकदाराने एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना शिस्त पाळली पाहिजे असेही तज्ज्ञ सांगतात.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT