share market sakal media
अर्थविश्व

सेन्सेक्स 61 हजार पार; निर्देशांकांची सहावी वाढ

कृष्ण जोशी

मुंबई : देशात व परदेशांमध्येही अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने आज भारतीय शेअरबाजार (Indian share market) निर्देशांकांनी सलग सहाव्या सत्रात वाढ दाखवली. चौफेर खरेदीच्या बळावर सेन्सेक्सने (sensex) देखील आज 61 हजारांचा टप्पा पार केला. आज व्यवहार सुरु झाल्यावर लगेच सेन्सेक्सने 61 हजारांचा जादुई टप्पा गाठला. त्यानंतर दिवसभरात एकदाच तो 61 हजारांच्या खाली म्हणजे 60,978.04 पर्यंत घसरला. नंतर तो दिवसभर 61 हजारांच्या वरच होता. आज सेन्सेक्स 568.90 अंशांनी वाढून 61,305.95 अंशांवर तर निफ्टी (nifty) 176.80 अंशांनी वाढून 18,338.55 अंशांवर बंद झाला.

24 सप्टेंबरला सेन्सेक्स 60 हजारांवर गेला, त्यानंतर केवळ 14 सत्रांमध्ये आज त्याने 61 हजारांच्या टप्प्याला स्पर्श केला. 13 ऑगस्ट रोजी सेन्सेक्स 55 हजारांच्या घरात होता. सेन्सेक्सच्या या तुफानी घोडदौडीमुळे या आर्थिक वर्षात म्हणजे एक एप्रिल पासून आतापर्यंत बीएसई वरील सर्व गुंतवणुकदारांच्या एकूण मालमत्तेचे मूल्य 68 लाखकोटी रुपयांनी वाढले. 31 मार्चरोजी हे मूल्य 204 लाखकोटी रुपये होते, तर आज हे मूल्य 272 लाखकोटी रुपये झाले. 31 मार्च रोजी निफ्टी 14,700 अंशांच्या आसपास होता, त्यानेही तेथून आज 18,300 अंशांच्यापुढे मजल मारली.

जागतिक अनुकूल वातावरणाबरोबच देशांतर्गत जाहीर झालेली चांगली आकडेवारी, घटणारी चलनवाढ, जीडीपी चा उत्साहवर्धक अंदाज यामुळे सध्या चौफेर खरेदी सुरु आहे. आज सेन्सेक्सच्या 30 प्रमुख शेअरपैकी 22 शेअर तेजीत होते, तर निफ्टीच्या 50 प्रमुख शेअरपैकी फक्त 16 घट दाखवीत बंद झाले.

सेन्सेक्समधील टीसीएसची घसरण आजही सुरूच राहिली. तो शेअर 44 रुपयांनी घसरून 3,611 रुपयांपर्यंत आला. तर बजाज फायनान्सही 67 रुपयांनी घसरून 7,860 रुपयांवर आला. एचसीएल टेक (बंद भाव 1,250), एशियन पेंट, एअरटेल, महिंद्र आणि महिंद्र, सनफार्मा, बजाज ऑटो हे शेअर आज घसरले.

दुसरीकडे एचडीएफसी बँक 46 रुपयांनी वाढून 1,685 रुपयांपर्यंत गेला. लार्सन अँड टुब्रो 37 रुपयांनी वाढून 1,789 रुपयांवर पोहोचला. एचडीएफसी ने देखील 44 रुपयांची वाढ दाखवीत 2,808 चा पल्ला गाठला. आयटीसी (256 रु.), आयसीआयसीआय बँक (727), इंडसइंड बँक (1,209), टेक महिंद्र (1,403), स्टेटबँक (490), बजाज फिनसर्व्ह (18,486), टाटास्टील (1,373), अल्ट्राटेक सिमेंट (7,403), डॉ. रेड्डीज लॅब (4,959) या शेअरचे भाव वाढले.

आजचे सोन्याचांदीचे भाव

सोने - 47,970 रु.

चांदी - 63,200 रु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Minister Statement : ''राजकीय गरज म्हणून जाहीर केल्या अनेक योजना; आता पूर्ण करणं कठीण'', भाजप मंत्र्याची कबुली; राजकीय वर्तुळात खळबळ!

Satej Patil : 'दोरी तुटली, आता बांध ही स्वतंत्र झाले'; हसन मुश्रीफ यांच्या 'त्या' वक्तव्यावर काय म्हणाले सतेज पाटील?

Budh Gochar 2025: वर्षातील शेवटचे गोचर 'या' 3 राशींचे भाग्य बदलू शकते, जीवनात दिसून येतील अद्भूत बदल

Shalinitai Patil: 'शालिनीताई पाटील यांना अखेरचा निरोप'; सातारारोड येथे अंत्यसंस्कार, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण!

Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण, चांदीही स्वस्त; तुमच्या शहरातील ताजा भाव जाणून घ्या

SCROLL FOR NEXT