share market sakal media
अर्थविश्व

Indian Share Market : सेन्सेक्स 410 अंश घसरला

कृष्ण जोशी

मुंबई : जागतिक शेअरबाजारांमधील (Share market) प्रतिकूल वातावरणामुळे आज भारतीय शेअरबाजारांमध्ये (Indian share market) आयटी आणि बँकांच्या (banks) समभागांमध्ये नफावसुली झाली. त्यामुळे भारतीय शेअरबाजार निर्देशांक सुमारे पाऊण टक्का घसरले. सेन्सेक्स (Sensex) 410.28 अंश तर निफ्टी (Nifty) 106.50 अंश घसरला. सेन्सेक्स आज साठहजार अंशांच्या पातळीखाली गेला.

आज नफावसुलीच्या जोरामुळे बाजारात चांगल्या उलथापालथी झाल्या. सेन्सेक्सने आज व्यवहारादरम्यान सुमारे बाराशे अंशांचा चढउतार पाहिला. सकाळी बाजाराचे व्यवहार सुरु झाल्यावर सेन्सेक्सने 60,285.89 अंशांचा उच्चांक नोंदवला. मात्र तेथून त्याची घसरण सुरु झाली. दुपारी युरोपीय बाजार घसरणीने उघडल्यावर सेन्सेक्समध्येही नफावसुली सुरु झाली व अडीच वाजण्याच्या सुमारास तो 59,045.53 अंशांपर्यंत म्हणजे उच्चांकापासून बाराशे अंशांपर्यंत खाली घसरला. मात्र तेथे पुन्हा खरेदी सुरु झाल्याने तो सावरला आणि व्यवहार संपताना 59,667.60 अंशांवर बंद झाला. निफ्टीदेखील 17,748.60 अंशांवर स्थिरावला.

आज भारती एअरटेल टक्केवारीच्या हिशोबात सर्वात जास्त घसरून 696 रुपयांवर स्थिरावला. टेक महिंद्र 49 रुपयांनी घसरून 1,414 रुपयांवर आला. बजाज फायनान्स 250 रुपयांनी घसरून 7,544 रुपयांवर तर बजाज फिनसर्व्ह 491 रुपयांनी घसरून 17,547 रुपयांवर आला. एचसीएल टेक (बंद भाव 1,269 रु.), इन्फोसिस (1,687) व टीसीएस (3,779) तसेच इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, अॅक्सीस बँक, स्टेट बँक, महिंद्र आणि महिंद्र व बजाज ऑटो यांच्या शेअरचे भाव घसरले. तर दुसरीकडे सन फार्मा (779 रु.), डॉ. रेड्डीज लॅब (4,832), रिलायन्स इंडस्ट्रीज (2,548), टाटा स्टील (1,280) या शेअरचे भाव वाढले.

आजचे सोन्याचांदीचे भाव

सोने - 46,040 रु.

चांदी - 60,100 रु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Islapur News : बँकेच्या कर्जाला कंटाळुन एका शेतकऱ्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Vehicle Fitness Test: आरटीओची मोठी डिजिटल झेप! ६ मिनिटांत वाहनांची फिटनेस तपासणी करणार, नवीन प्रणाली कधी लागू करणार?

Pune BJP leads in campaign : पुण्यात भाजपचा प्रचाराचा धडाका!, महापालिका निवडणुकीसाठी जबरदस्त नियोजन

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

Viral Video : वजन झेपलं नाही अन् बंजी जंपिंगची दोरी तुटली..खोल दरीत पडून शरीराचे अवयव झाले वेगळे; धक्कादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT