Ratan Tata Sakal
अर्थविश्व

Ratan Tata : रतन टाटांनी शेअर केला 25 वर्षांपूर्वीचा फोटो; इंडिका कारची आठवण जागवत म्हणाले, भारताच्या...

टाटा इंडिकाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

रतन टाटा यांनी इंस्टाग्रामवर भारतातील पहिली स्वदेशी कार टाटा इंडिका लाँच झाल्याची आठवण जागवली आहे. त्यांनी टाटा इंडिकाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

इंडिकासोबतचा एक फोटो शेअर करताना, टाटांनी लिहिले, "पंचवीस वर्षांपूर्वी टाटा इंडिका लाँच करणे हा भारताच्या स्वदेशी कार उद्योगाचा जन्म होता. आज या आठवणींना उजाळा दिला आणि माझ्या हृदयात विशेष स्थान आहे."

1998 मध्ये टाटा मोटर्सने टाटा इंडिका लॉन्च केली होती परंतु ती टेक ऑफ करण्यात अयशस्वी झाली. कमी विक्रीमुळे, टाटा मोटर्सने पदार्पणाच्या एका वर्षातच आपला नवीन कार व्यवसाय विकण्याचा निर्णय घेतला.

रतन टाटा आणि त्यांची टीम फोर्डचे चेअरमन बिल फोर्ड यांना भेटण्यासाठी अमेरिकेला गेले. या भेटीत टाटा यांचा फोर्ड कंपनीने अपमान केला होता.

टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इंडियन हॉटेल्स आणि टाटा टेलिसर्व्हिसेस या काही प्रमुख कंपन्या त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. इतक्या उंचीवर जाताना त्यांना अनेक चढ-उतारांचा आणि अपमानाचा सामना करावा लागला होता.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू...

एका कार्यक्रमात रतन टाटा यांच्या अगदी जवळचे असलेले प्रवीण कडले यांनी फोर्डची एक गोष्ट सांगितली. रतन टाटा यांनी 1998 मध्ये हॅचबॅक कार इंडिका बाजारात आणली होती.

परंतु ऑटो अॅनालिस्टने या कारवर पूर्णपणे टीका केली आणि परिणामी, विक्रीवर असलेल्या टाटा इंडिकाला बाजारातून चांगला प्रतिसाद मिळाला नाही आणि 1 वर्षाच्या आत टाटा इंडिका फ्लॉप झाली, ज्यामुळे टाटा मोटर्सचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर रतन टाटा यांना निर्णयावर अनेकांचे टोमणे ऐकावे लागले.

त्यानंतर काही जवळच्या लोकांनी आणि गुंतवणूकदारांनी रतन टाटा यांना इंडिकामुळे झालेला तोटा भरून काढण्यासाठी त्यांचा कारचा व्यवसाय दुसऱ्या कंपनीला विकण्याचा सल्ला दिला, कारण रतन टाटा यांची कार लॉन्च करण्याची योजना होती आणि ती तोट्याची होती.

टाटा यांनी ही सूचना योग्य समजली आणि ती स्वीकारली. आपली कार कंपनी भागीदारांसोबत फोर्ड कंपनीला विकण्याचा प्रस्ताव रतन टाटा आणि त्यांच्या भागीदारांची फोर्ड कंपनीसोबतची बैठक सुमारे 3 तास चालली.

फोर्ड कंपनीचे चेअरमन बिल फोर्ड हे रतन टाटा यांनी त्यांना कडू शब्द सुनावले. जमत नव्हतं तर कशाला या कारच्या धंद्यात उतरलास. करण्यासारखी बरीच कामे आहेत. आता तुझी कंपनी विकत घेऊन मी तुझ्यावरच उपकार करत आहे हे वाक्य रतन टाटा यांच्या मनावर कोरले गेले.

प्रयत्न करणं आणि त्यात अपयशी होणं ही तर शिकण्यासारखीच गोष्ट आहे. पण, टाटांनी हा अपमान सकारात्मकरित्या घेतला. त्यांनी फोर्डला चांगला कार व्यवसायिक होऊन दाखवायचं पक्क केलं. काही वर्षांतच भारतातील फोर्ड कंपनीची हिस्सेदारी टाटांनी विकत घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT