investment sector
investment sector  sakal
अर्थविश्व

दरमहा 4 हजार गुंतवा अन् मिळवा 30 लाखांपेक्षा जास्त परतावा…

सकाळ डिजिटल टीम

एलआयसी आजही लोकांची फेव्हरेट आहे, कारण पैसे बचत, सुरक्षा, आणि प्रचंड परतावा यामुळे एवढ्या वर्षात एलआयसीच्या ग्राहकांमध्ये त्यांच्यावरचा विश्वास वाढत चालला आहे. आज आम्ही तुम्हाला अशीच आणखी एक एलआयसीच्या चांगल्या योजनेबद्दल सांगणार आहोत आणि ही योजना म्हणजे जीवन तरुण (LIC Jeevan Tarun Plan) आहे. यात अगदी तान्ह्या बाळासाठी तुम्ही पॉलिसी काढू शकता. (invest 4 thousand per month and get a return of over 30 lakhs know new plan of lic)

पॉलिसीची वैशिष्ट्ये ज्या मुलांचे वय 90 दिवसांपासून ते कमाल 12 वर्षे आहे त्यांच्यासाठी ही पॉलिसी सुरू करता येते. विमा रक्कम (सम अॅश्युअर्ड) किमान 75000 असावी. कमाल मर्यादा नाही. ही पॉलिसी मुलाच्या वयाच्या 25 वर्षापर्यंतच असते.

जेव्हा मुलाचे वय 25 वर्षे पूर्ण होईल, तेव्हा या पॉलिसीची परिपक्वता रक्कम (Maturity Amount) मुलाला दिली जाईल. या योजनेतील पॉलिसीची मुदत मुलाच्या वयानुसार निश्चित केली जाते. उदाहरणार्थ, जर मुलाचे वय तीन वर्षे असेल, तर पॉलिसीची मुदत आपोआप 22 वर्षे होईल. दुसरीकडे, जर मुलाचे वय 10 वर्षे असेल, तर पॉलिसीची मुदत आपोआप 15 वर्षे होईल.

या प्लॅनचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला हवे असल्यास मुलाचे वय 25 वर्षे असेल, तरच तुम्हाला एकरकमी पैसे मिळू शकतात. पण जर तुम्हाला मुल 20 वर्ष वयापासून ते 25 वर्ष वयापर्यंत प्रत्येक वर्षी काही रक्कम मिळत राहावी असे वाटत असेल, तर ही पॉलिसी तो पर्यायही देते. त्यासाठी ही पॉलिसी सुरू करताना, एकरकमी पैसे मिळण्याऐवजी, तुम्ही मनी बॅकचा पर्याय निवडू शकता. जर तुम्ही 5 टक्के पैसे परत करण्याचा पर्याय निवडला तर 20 ते 24 वर्षांपर्यंत 5-5 टक्के पैसे परत मिळतील आणि वयाच्या 25 व्या वर्षी उर्वरित 75 रक्कम मिळेल.

याशिवाय तुम्ही 10 टक्के मनी बॅक आणि 15 टक्के मनी बॅकचा पर्यायही निवडू शकता. 4 हजारांवर 30 लाखांपेक्षा जास्त परतावा मूल जन्माला आल्यावर पहिल्या वर्षीच जीवन तरुण पॉलिसी (Jeevan Tarun Policy) सुरू करावी लागेल. तेव्हाच, मुलाची पॉलिसी टर्म 25 वर्ष असेल. तसेच, वयाच्या 25 व्या वर्षी एकरकमी परतावा घेण्याचा पर्याय निवडावा लागेल.

याच वेळी सम अॅश्युअर्ड 12 लाख निवडावे लागतील. या अंतर्गत पहिल्या वर्षासाठी दरमहा 4368 रुपये प्रीमियम भरावा लागेल. त्याच वेळी, दुसऱ्या वर्षापासून विमा संपेपर्यंत, दरमहा 4274 रुपये प्रीमियम भरावा लागेल. त्यानंतर, 25 व्या वर्षाच्या मॅच्युरिटीवर, सुमारे 30,90,000 रुपये परतावा मिळेल.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT