gold main.jpg 
अर्थविश्व

सोनं 16 वर्षांत 7000 वरुन पोहोचले तब्बल 56000 हजारांवर !

सकाळ ऑनलाइन टीम

नवी दिल्ली- सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. विशेषतः मागील 16 वर्षांत तर सोन्याच्या गुंतवणुकीत वाढ होताना दिसत आहे. या कालावधीत सोने 7000 ते 56000 प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचले. सात ऑगस्ट 2020 मध्ये 56 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत दर पोहोचल्यानंतर सोन्याचे दर सातत्याने घसरत आहेत. आता 9000 रुपयांपर्यंत दरात घसरण झाली आहे. दुसरीकडे 2006 मध्ये सोन्याचा दर 9 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळपास होता. जो 2016 मध्ये 31 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचला होता. म्हणजेच 9 वर्षांत सोन्याच्या दरात तीन पट वाढ झाली. 

त्यानंतर 2017 मध्ये किरकोळ वाढीनंतर सोन्याचा दर 2018 मध्ये कमी होऊन 29000 पर्यंत आला. सोन्याची चमक पुन्हा एका 2019 मध्ये वाढली आणि 10000 रुपये प्रति ग्रॅमच्या उसळीबरोबर 39000 वर पोहोचला. सोन्याची उसळी इतक्यावरच थांबली नाही. सोन्याच्या दरातील तेजीची ही लाट 2020 मध्येही कायम राहिली आणि ती 17000 रुपयांच्या जबरदस्त उसळीबरोबर ऑलटाइम हाय 56254 वर पोहोचले. कारण व्याज दर इतके कमी झाले की गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने सर्वात चांगले माध्यम बनले. जेव्हा जेव्हा व्याज दर घटतात. तेव्हा सोन्यातील गुंतवणूक वाढते. 

गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय
शेअर मार्केट आणि सोन्यामध्ये असा संबंध आहे की, जेव्हा जेव्हा शेअर मार्केट कोसळतो, तेव्हा मंदीची चाहूल लागते. परंतु, त्याचवेळी सोन्यात तेजी सुरु होते. ग्लोबल कन्सल्टिंग फर्म डेलोइटने एप्रिलच्या आऊटलूकमध्ये व्याजदरात घसरण होईल असे म्हटले होते. नंतर व्याजदरात घटही झाली. आज देशातच नव्हे तर संपूर्ण जगात बँकांचे व्याज दर एका दशकातील सर्वात कमी आहे. आजच्या तारखेला भारतात रेपो रेट फक्त 4 टक्क्यांच्या जवळपास आहे. व्याज दर कमी आहे, अशात लोकांसमोर सोन्यातील गुंतवणूक हाच चांगला पर्याय झाला आहे. 

2020 मध्ये 25 टक्क्यांची तेजी होती
कोरोना विषाणूचा प्रभाव कमी करण्यासाठी जगभरातील केंद्रीय बँका आणि सरकारकडून महसुली उपायांसाठी मागीलवर्षी सोन्याच्या किंमतींमध्ये 25 टक्क्यांहून अधिक वाढ केली होती. तर चांदी सुमारे 50 टक्क्यांनी वाढली होती. सोन्याला महागाई आणि रुपयाच्या घसरणीपासून सुरक्षा देणारे मानले जाते. परंतु, तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किंमतीतील घसरण केवळ स्टॉक मार्केटमधील तेजी नव्हे तर इतर गोष्टीही कारणीभूत आहेत. 

अँजेल ब्रोकरेजच्या अहवालानुसार, मागील 10 वर्षांत सेन्सेक्स आणि निफ्टीत 9.05 टक्के आणि 8.5 वार्षिक वाढीची वृद्धी दिसून आली. 2010 आणि 2015 दरम्यान 2012 च्या मंदीनंतही वाढ दिसून आली होती. फेब्रुवारी 2016 ते फेब्रुवारी 2020 पर्यंत सेन्सेक्समधील वाढ पाहता ती 17500 वरुन 40000 अंकापर्यंत पोहोचली. हे स्पष्ट आहे की, रिस्क असूनही इक्विटीमधील गुंतवणुकीचा ट्रेंड वाढत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT