KBCols
KBCols Sakal
अर्थविश्व

कृत्रिम रंगांमुळे होणाऱ्या प्रदुषणाला रोखणारी स्टार्टअप 'केबीकोल सायन्सेस'

सलील उरुणकर @salilurunkar

खाद्यपदार्थांपासून सौंदर्यप्रसाधनांपर्यंत आणि औषधांपासून वस्त्रनिर्मितीपर्यंत सर्वच क्षेत्रात आणि प्रक्रियांमध्ये कृत्रिम रंगांचा वापर वाढला आहे. जगभरामध्ये सात लाख टन एवढ्या मोठ्या प्रमाणावर कृत्रिम रंगाची (सिंथेटिक डाय) निर्मिती केली जाते. केवळ वस्त्रोद्योग क्षेत्राचाच विचार केला तर त्यामध्ये दहा हजाराहून अधिक विविध प्रकारचे रंग आणि रंगद्रव्य (डाय आणि पिग्मेंट) वापरले जातात. या सर्व प्रक्रियेदरम्यान होणाऱ्या पाण्याच्या प्रदुषणाचा विचार केला तर एकट्या वस्त्रोद्योग क्षेत्राचा अशा जलप्रदुषणातील वाटा 20 टक्के आहे. (KBCols Sciences bio based colors to prevent synthetic’s adverse health effects)

प्रदुषणामुळे कार्सिनोजेनिक रसायने, रंग आणि काही अवजड धातू पाण्यात मिसळतात आणि ते केवळ पर्यावरणाचीच हानी करतात असे नाही तर पिण्याच्या पाण्याचे स्रोतसुद्धा प्रदुषित करीत आहेत. त्यामुळे साहजिकच या प्रदुषणाला आळा घालण्याचा विचार करताना या प्रदुषित पाण्यावर प्रक्रिया करण्याचा विचार नेहमी केला जातो. मात्र ज्या कारणामुळे हे प्रदुषण होत आहे म्हणजेच कृत्रिम रंगांबाबत काय करता येईल याचा विचार फारसा केला जात नाही.

मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनिअरिंग (आयसीटी) या संस्थेत एमटेक इन बायोप्रोसेस टेक्नाॅलाॅजीचे शिक्षण घेत असलेल्या वैशाली कुलकर्णी यांना हा प्रश्न पडला. नवी मुंबईतील ओरियंटल एज्युकेशन सोसायटीच्या काॅलेज ऑफ फार्मसी मधून त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले होते. एमटेक झाल्यानंतर त्यांना 2017 मध्ये पीएचडी मिळाली.

आयसीटीमधील केमिकल इंजिनिअरिंग विभागात संशोधनकार्य करीत असताना वैशाली यांना ही नवसंकल्पना सुचली. एखादा आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा तो आजार होऊच नये अशी प्रतिबंधात्मक उपाययोजना कधीही चांगलीच. याच धर्तीवर कृत्रिम रंगांमुळे होणाऱ्या प्रदुषणाला टाळण्यासाठी नैसर्गिक व सुरक्षित रंगांची निर्मिती चांगली हा विचार त्यांनी केला. पीएचडी पूर्ण करत असताना या गोष्टीवर त्यांनी विचार सुरू ठेवला आणि या विषयात काम करण्याचा निश्चय केला.

डाॅ. वैशाली कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी व सहसंस्थापक डाॅ. अर्जूनसिंग बाजवा यांनी केबीकोल सायन्सेस (KBCols Sciences) या नावाने स्टार्टअप कंपनी स्थापन केली. बायोप्रोसेस टेक्नाॅलाॅजी या तंत्रज्ञानावर आधारित ही स्टार्टअप आता कृत्रिम रंगांमुळे होणारे पर्यावरणीय नुकसान कमी करण्यासाठी आणि बायोडिग्रेडेबल व शाश्वत अशा नैसर्गिक रंगांच्या निर्मितीसाठी काम करत आहे. (KBCols Sciences bio based colors to prevent synthetic’s adverse health effects)

काय आहे संकल्पना

औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या रंगद्रव्य आणि बायोअ‍ॅक्टिव्ह पदार्थांच्या निर्मितीसाठी जैवतंत्रज्ञानाच्या आधारे काम करत असताना अनेक आव्हाने डाॅ वैशाली यांच्यासमोर उभी राहिली.

डाॅ. वैशाली सांगतात, "जेव्हा आपण नैसर्गिक रंगांचा विचार करतो त्यावेळी आपण फक्त झाडांचा, प्राण्यांचा किंवा व्हेजिटेबल कलर्सचा विचार करतो. पण या स्रोतांपासून होणारी रंगनिर्मिती ही शाश्वत नाही. उदाहरणार्थ झाडांची वाढ होण्यासाठी अनेक महिने लागतात तसेच त्यांची वाढ ही हवामानावर अवलंबून असते. तसेच प्रत्येक भागातील माती व अन्य घटकांचा विचार करता अशा झाडांची पुनर्निर्मिती शक्य नसते किंवा त्यात सातत्य राहू शकत नाही. त्यामुळे आम्ही नैसर्गिक रंगनिर्मितीसाठी अशा जैवसंसाधनांचा विचार केला की ज्याची पुनर्निर्मिती शक्य आहे आणि ते शाश्वत असेल."

टेक्सटाईल कंपन्यांमध्ये सध्या प्रयोग सुरू

"सध्या प्रायोगिक तत्वावर आम्ही सूक्ष्मजीवांद्वारे ही प्रक्रिया करीत आहोत. एका बायोरिअ‍ॅक्टरमध्ये या सूक्ष्मजीवांची वाढ केली जात आहे. वापरण्यासाठी सुरक्षित आणि पावडर स्वरुपात रंगांचे उत्पादन करणारी ही प्रक्रिया आहे. अशाच प्रकारे टेक्सटाईल, होम केअर, पर्सनल केअर आदी क्षेत्रांमध्ये वापरण्यायोग्य अशा नैसर्गिक रंगांच्या निर्मितीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत," असेही डाॅ. वैशाली यांनी सांगितले.

सध्या सात ते आठ टेक्सटाईल कंपन्यांबरोबर केबीबोल सायन्सेस प्रायोगिक तत्त्वावर काम करत आहे. या कंपन्यांमध्ये एका भारतीय कंपनीचा तसेच इटली, जपान आणि श्रीलंकेतील अन्य कंपन्यांचा समावेश आहे. प्रयोग आणि चाचण्यांचे निष्कर्ष सकारात्मक आले तर पुढील वर्षी हे नैसर्गिक रंग व्यावसायिक बाजारात उपलब्ध होऊ शकतील, असा विश्वास डाॅ. वैशाली यांनी व्यक्त केला.

केबीकोल सायन्स (KBCols Sciences) स्टार्टअपला केंद्र सरकारच्या बायोटेक्नाॅलाॅजी इंडस्ट्री रिसर्च अ‍ॅसिस्टन्स कौन्सिलकडून (Biotechnology Industry Research Assistance Council) बायोटेक्नाॅलाॅजी इग्निशन ग्रांट (Biotechnology Ignition Grant) आणि सोशल इनोव्हेशन प्रोग्रॅम फाॅर प्रोडक्ट्सः अफोर्डेबल अँड रेलेव्हन्ट टू सोसायटल हेल्थ (स्पर्श) या दोन योजनांद्वारे अनुक्रमे 70 हजार अमेरिकन डाॅलर व एक लाख अमेरिकन डाॅलर एवढा अनुदान निधी देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त कंपनीला अनेक पुरस्कार मिळाले आहेत ज्यामध्ये टेक्नाॅलाॅजी डेव्हलपमेंट बोर्डचा नॅशनल अवाॅर्ड 2020 (स्टार्टअप विभाग) याचाही समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT