LIC IPO sakal media
अर्थविश्व

LIC IPO Live Updates: आतापर्यंत 33 टक्के विक्री; पॉलिसीधारकांची 1.16 पट खरेदी

देशातील सर्वात मोठ्या IPO ने पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठा दणका दिलाय.

सकाळ डिजिटल टीम

LIC IPO Live Updates: भारतीय बाजारांच्या इतिहासातील सर्वात मोठा (IPO), LIC IPO ने 4 मे रोजी, बोलीच्या पहिल्या दिवशी 12:51 तासांनी 33 टक्के समभागांची विक्री झाली आहे. एलआयसी पॉलिसीधारक आयपीओमध्ये खरेदी करण्यात आघाडीवर आहेत. त्यांनी आरक्षित क्षमतेच्या 1.16 पट सदस्यत्व घेतले आहे.

कर्मचाऱ्यांसाठीचा राखीव भाग 58 टक्के, तर किरकोळ गुंतवणूकदारांनी36 टक्के खरेदी झाली आहे. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी त्यांच्या भागाच्या 8 टक्के सदस्यता घेतली आहे, तर पात्र संस्थागत खरेदीदारांनी आतापर्यंत 3.95 कोटी समभागांच्या वाटप केलेल्या कोट्याच्या तुलनेत 6,060 शेअर्स खरेदी केले आहेत.

एलआयसी 65 वर्षांपासून भारतातील लोकांना जीवन विमा प्रोडक्ट्स देत असल्यााचे मार्केट एक्स्पर्ट आनंद राठी म्हणाले. ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. प्रीमियमच्या (GWP) संदर्भात त्याचा बाजारातील हिस्सा 61.6 टक्के आहे. नवीन बिझनेस प्रीमियमच्या बाबतीत त्याचा शेअर बाजारातील हिस्सा 61.4 टक्के आहे. वैयक्तिक पॉलिसींच्या बाबतीत त्यांचा बाजारातील हिस्सा 71.8 टक्के आहे.

प्राइस बँडच्या वरच्या स्तरावर LIC च्या IPO ची व्हॅल्यू त्याच्या एम्बेडेड व्हॅल्यूच्या 1.11 पट आहे. त्याचे व्हॅल्युएशन 6 लाख कोटी रुपये आहे, जे खासगी जीवन विमा कंपन्यांपेक्षा कमी आहे. एलआयसीचा आयपीओ गुंतवणूकदारांना आकर्षक दिसत आहे. LIC ने आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO सादर केला आहे. त्याचे प्रॉडक्ट पोर्टफोलिओ डायव्हर्सिफायड आहे. आर्थिक ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. या सर्व कारणांमुळे, आनंद राठी या शेअरचे सबस्क्रिप्शन घेण्याचा सल्ला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT