LIC
LIC esakal
अर्थविश्व

दिवसाला गुंतवा 233 रुपये आणि मिळवा 17 लाख, LICची नवी योजना

सकाऴ वृत्तसेवा

जर तुम्हाला सुद्धा तुमचे पैसे सुरक्षित गुंतवणुकीत गुंतवायचे असतील तर तुम्ही LIC च्या विशेष पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकता.

- शिल्पा गुजर

एलआयसी जीवन लाभ पॉलिसी (LIC Jeevan Labh Policy): नोकरी सुरू झाल्या झाल्या सरकारी किंवा म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. लवकर गुंतवणूक सुरु केली की त्याचा चांगला आणि भरघोस परतावा मिळतो. त्यामुळेच नोकरी लागल्या लागल्या गुंतवणूक करा जेणेकरून तुमचे भविष्य सुरक्षित असेल आणि जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुमच्याकडे एकरकमी पैसे असतील. जर तुम्हाला सुद्धा तुमचे पैसे सुरक्षित गुंतवणुकीत गुंतवायचे असतील तर तुम्ही LIC च्या विशेष पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकता. यासाठी तुम्हाला दरदिवशी 233 रुपये गुंतवावे लागतील. या पॉलिसीचे नाव LIC जीवन लाभ पॉलिसी (LIC Jeevan Labh Policy)आहे.

बाजाराशी जोडलेले नाही, तुमचे पैसे सुरक्षित

एलआयसीची ही पॉलिसी बाजाराशी जोडलेली नाही. त्यामुळेच बाजारातल्या चढ–उतारांचा कोणताही परिणाम तुम्ही या पॉलिसीमध्ये गुंतवलेल्या पैशांवर होणार नाही. याचा अर्थ असा की या योजनेमध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. ही एक प्रकारची मर्यादित प्रीमियम योजना आहे, त्यामुळे या योजनेचा मुख्य उद्देश मुलांचे शिक्षण, लग्न आणि मालमत्ता खरेदी करणे आहे.

या पॉलिसीची वैशिष्ट्ये

ही पॉलिसी कोणत्याही व्यक्तीला नफा आणि संरक्षण दोन्ही देते. 8-59 वयोगटातील लोक या पॉलिसीमध्ये सहज पैसे सुरक्षित करू शकतात. या पॉलिसी अंतर्गत 16-25 वर्षांचा कालावधी घेता येतो. यामध्ये तुम्हाला किमान 2 लाख रुपयांची विमा रक्कम घ्यावी लागेल. सतत 3 वर्ष प्रीमियम भरून कर्जाची सुविधा मिळू शकते. प्रीमियमला कर सूट (Tax Benefit)मिळेल आणि पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, वारसाला विम्याची रक्कम आणि बोनसचा लाभ मिळेल.

पॉलिसी अंतर्गत मृत्यू लाभ (Death Benefit) उपलब्ध

पॉलिसीधारक पॉलिसीच्या मॅच्युरिटीआधी मरण पावला आणि त्या व्यक्तीने मृत्यूपर्यंतचे सर्व हप्ते भरले असतील, तर या पॉलिसीचा मृत्यू लाभ वारसाला दिला जाईल. नॉमिनीला विमा रक्कम, साधा प्रत्यावर्ती बोनस (Simple Reversnery Bonus)आणि फायलन एडीशन बोनस मिळतो.

233 रुपयांच्या गुंतवणुकीवर 17 लाख रुपये मिळतील

समजा तुम्ही 23 वर्षांचे आहात आणि तुम्ही 16 वर्षांचा टर्म प्लॅन आणि 10 लाखांची विमा रक्कम निवडली आहे. तर तुम्हाला 10 वर्षांपर्यंत दरदिवशी 233 रुपये जमा करावे लागतील. तुमच्याकडे एकूण 8,55,107 रुपये जमा होतील. ही रक्कम परिपक्वता (Mature) झाल्यावर म्हणजेच वयाच्या 39 व्या वर्षी तुमच्याकडे 17,13,000 रुपये जमा असतील.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो,शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT