Market recovery after lock down
Market recovery after lock down Sakal
अर्थविश्व

लाॅकडाऊन २.० इफेक्टः मार्केट रिकव्हरीसाठी लागू शकतात किमान ३ वर्ष

सलील उरुणकर @salilurunkar

पुणेः एकीकडे कारखाने-उद्योगधंदे सुरू ठेवण्यासाठीचा न टाळता येणारा खर्च.. तर दुसरीकडे खेळते भांडवल (वर्किंग कॅपिटल) कमी होत आहे आणि त्यासाठी लागणारा कालावधी (सायकल टाईम) वाढत चालला आहे. याचा परिणाम अनेक कंपन्यांच्या आर्थिक परिस्थितीवर होत आहे. कोव्हिड-19 ची सध्याची दुसरी लाट आणि जागोजागी असलेल्या अंशतः वा पूर्ण लाॅकडाऊनमुळे (Lockdown 2.0) उद्योगधंद्यांची स्थिती बिकट होत चालली असून मार्केट रिकव्हरीसाठी (Market Recovery post covid-19) किमान तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. (Lockdown 2.0 effect; Market will take three years for recovery)

कोव्हिड-19 महामारीच्या सुरवातीच्या काळात म्हणजे मार्च 2020 नंतर लावण्यात आलेल्या लाॅकडाऊननंतर बाजारातील परिस्थिती सावरण्यास सुरवात झाली होती. मात्र अचानक वाढलेल्या कोव्हिड-19 च्या केसेसमुळे विविध शहरे, राज्यांमध्ये पुन्हा अंशतः वा पूर्ण लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. परिणामतः अनेक कारखाने, कंपन्या, उद्योग हे संकटात सापडले आहेत. व्यवसाय सांभाळण्याबरोबरच लोकांनाही सांभाळायचे आहे, कामगारांना वेळेवर पैसे देण्यासाठी कंपन्या प्रयत्नशील आहेत परंतु आता त्या कात्रीत सापडल्या आहेत.

वाॅलप्लास्ट प्रोडक्ट्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलन ठक्कर यांच्याशी याबाबत संवाद साधला असता ते म्हणाले, "अनेक क्षेत्रातील कंपन्या पूर्वीप्रमाणे वस्तूंचा, कच्च्या मालाचा साठा (इन्व्हेन्टरी) ठेवू शकत नाही. पहिल्या लाॅकडाऊनमध्ये नियोजनाचे काही धडे घेतल्यानंतर आता कच्चा माल गरजेप्रमाणेच आॅर्डर केला जात आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत कंपन्यांच्या पुरवठा साखळी (सप्लाय चेन) व्यवस्थापन आणि नियोजनात अमुलाग्र बदल झाला आहे. एकीकडे इन्व्हेन्टरी कमी, दुसरीकडे वर्किंग कॅपिटल अडकून पडत आहे आणि सायकल टाईम आता 45 ऐवजी 90 दिवसांवर पोचला आहे. कच्चा माल घेताना रोख रक्कम देऊन घ्यावा लागत आहे मात्र विक्रीपश्चात मिळणारे पैसे बाजारातच अडकून पडले आहेत. अशा परिस्थितीत कंपन्या किती काळ टिकाव धरू शकतील याबाबत शंका वाटते." (Lockdown 2.0 effect; Market will take three years for recovery)

सूक्ष्म व लघु उद्योगांच्या दृष्टीने मोलाचा सल्ला देत ठक्कर म्हणाले, "पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये उद्योगांना - विशेषतः सूक्ष्म व लघु उद्योगांना - भविष्यात खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागणार आहे. तंत्रज्ञानामुळे या साखळी व्यवस्थापनामध्ये 10 ते 12 टक्क्यांनी सकारात्मक फरक पडत असल्याचा आमचा स्वतःचा अनुभव आहे. कामगार पुन्हा आपापल्या गावी परतल्यामुळे त्याचा परिणाम कंपन्यांच्या कार्यक्षमता आणि उत्पादन क्षमतेवर होणार हे निश्चित आहे. हे सर्व पैलू लक्षात घेतल्यास, मार्केट रिकव्हरीसाठी किमान तीन वर्षाचा कालावधी लागेल असे माझे मत आहे. तोपर्यंत उद्योग-व्यवसायात टिकून राहणेच कंपन्यांना अवघड जाऊ शकते."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

Viral Video: संसदेमध्ये असला राडा कधीच पाहिला नसेल! सभागृहात खासदारांमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडिओ

Nashik Crime News : रेल्वे कर्मचाऱ्याकडूनच पानेवाडीत इंधनाची चोरी; 6 जण ताब्यात

Latest Marathi News Live Update : बिभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणाचा निर्णय कोर्टाने राखून ठेवला

SCROLL FOR NEXT