Bank-of-maharashtra 
अर्थविश्व

महाबॅंकेची १४ हजार कोटींची कर्जे झाली ‘राइट ऑफ’ !

सकाळवृत्तसेवा

पुणे - बॅंक ऑफ महाराष्ट्रने चार वर्षांत १४ हजार ६४१ कोटी रुपयांची कर्जे निर्लेखित (राइट ऑफ) केली आहेत. बड्या थकबाकीदारांकडे ७१०० कोटी रुपयांची कर्जे थकित होती. त्यापैकी फक्त २५० कोटी रुपये म्हणजे केवळ चार टक्के वसुली आजपर्यंत झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बॅंकांकडून घेतलेले कर्ज निर्लेखित करण्यावरून खूप गदारोळ होत आहे. ही कर्जे तांत्रिक नियम वापरून माफ केली जातात, असा आरोप झाला होता. परंतु, ‘राइट ऑफ’ करणे म्हणजे कर्जमाफी नाही. त्या कर्जाची वसुली सुरूच राहते, असा दावा अर्थ खात्याकडून करण्यात आला होता.

माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्रला भागधारक म्हणून वार्षिक सर्वसाधारण सभेत दरवर्षी १०० कोटींवर थकीत कर्ज असलेल्या आणि ‘राइट ऑफ’ केलेल्या कर्जखात्यांची नावे मागितली होती. त्यातून ही माहिती समोर आली आहे.

वेलणकर म्हणाले, ‘‘गेल्या चार वर्षांत बॅंकेने बड्या कर्जदारांची कर्जे ‘राइट ऑफ’ केली. ३१ मार्च २०२० पर्यंत त्यातील फक्त २५० कोटी रुपयांची वसुली बॅंक करू शकली आहे. बड्या थकित कर्जदारांची नावे मला गोपनीयतेच्या नावाखाली दिली नाहीत. मात्र, स्टेट बॅंकेने २२५ बड्या कर्जदारांची नावे कशी दिली? बॅंकेनुसार गोपनीयतेची व्याख्या आणि निकष वेगळे असतात का? ज्यांची कर्ज वसूल होण्याची आशा सोडून दिली आहे, अशांची माहिती कशासाठी गोपनीय ठेवली जात आहे?’’

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro: मेट्रो ३ अ‍ॅक्वा लाईनला तीन महिने; तरीही ‘नो नेटवर्क’चा प्रवाशांना त्रास, नेटवर्क रखडण्याचे खरे कारण आले समोर

BMC Election: स्मार्ट, हरित आणि सुरक्षित मुंबईचे आश्वासन; अजित पवारांनी मांडली विकासाची दिशा, जाहीरनामा प्रकाशित

EPF Salary Limit : लाखो कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! ‘EPF’साठी नवीन पगार मर्यादा लवकरच होणार निश्चित

Thane News: भ्रष्टाचार आणि अनधिकृत बांधकाम मुक्तीचा सत्ताधाऱ्यांचा नारा; भाजप-शिवसेना महायुतीच्या "निर्धारनामा"चे प्रकाशन, काय लिहिलंय?

फुल पैसा वसूल! ६ दिवसात 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम'ची डबल कमाई; किती होतं चित्रपटाचं बजेट?

SCROLL FOR NEXT