maruti 
अर्थविश्व

SUV कॅटेगरीमध्ये येतायत, Marutiच्या तीन नव्या गाड्या

सकाळ डिजिटल टीम

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Maruti Suzuki कंपनीने आता नव्या गाड्या लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये कंपनी पाच गाड्या लाँच करणार असली तरी, त्यांच्या SUV कॅटेगरीतील गाड्यांकडे ऑटोमोबाईल क्षेत्राचं विशेष लक्ष लागलंय. सध्या या कॅटेगरीमध्ये ह्युंडाई कंपनीची किआ ही गाडी बाजारात मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे Maruti Suzuki कंपनी मोठ्या तयारीने या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. 

तीन नवे मॉडेल्स होणार लाँच
Maruti Suzukiकडून एखादे नव्हे तर, SUV सेगमेंटमधील तीन नवीन मॉडेल्स लाँच होणार आहेत. या सगळ्या गाड्या 4 मीटरपेक्षा अधिक लांबी असणाऱ्या असतील. कंपनी आपल्या सगळ्यात पॉप्युलर ब्रिझा या कारचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल 2022मध्ये लाँच करणार आहे. यासह कंपनीची नवी कॉम्पॅक्ट क्रॉसओवर कारही बाजारात येणार आहे. ही कार बलेनो प्लॅटफॉर्मवर आधारीत असून, त्याची बाजारात टाटा नेक्सनशी जोरदार टक्कर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 4 मीटरच्या कॅटेगरीमध्ये Maruti Suzuki जिम्नी हे मॉडेल बाजारात उतरवले जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी पाच डोअर असलेले जिम्नी मॉडेल 2023मध्ये बाजारात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. 

पुन्हा डिझेल इंजिन?
Maruti Suzuki कंपनी गेल्या काही महिन्यांपासून डिझेल इंजिनच्या गाड्यांच्या मागणीचा अभ्यास करत आहे. एप्रिल 2020मध्ये बीएस-6 नियमावली लागू झाल्यानंतर, कंपनीने डिझेल इंजिन कारचा पुरवठा बंद करून केवळ पेट्रोल आणि सीएनजी गाड्यांचा वापर करण्याचा निर्णय कंपनीने घेतला होता. परंतु, कंपनीने आता आपले धोरण बदलले असून, कंपनी पुन्हा डिझेल इंजिन गाड्यांच्या निर्मितीचा विचार करत आहे.

आणखी वाचण्यासाठी क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT