Share Market
Share Market Sakal
अर्थविश्व

Share Market : 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा छोटा पॅकेट बडा धमाका शेअर

शिल्पा गुजर

मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी तुमच्यासाठी मजबूत स्टॉक निवडला आहे.

शेअर मार्केट (Share Market) अशी जागा आहे जिथे दर्जेदार शेअर्स तुम्हाला मालामाल करतीलच, कारण तिथे गुंतवणूक (Investment) करताना आपण किंमतीचा विचार नाही करत फक्त दमदार शेअर्स आहेत की नाही याचा विचार करतो. पण कधी कधी शेअर मार्केटमध्ये कमी किंमतीचे शेअर्सही भाव खाऊन जातात आणि तुम्हाला तगडी कमाई करुन देतात. आताही तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल आणि चांगले शेअर्स शोधत असाल तर मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी तुमच्यासाठी मजबूत स्टॉक निवडला आहे. संदीप जैन यांनी मेनन बेअरिंग्जची (Menon Bearings) निवड केली आहे. शॉर्ट टर्मसाठी यात पैसे गुंतवण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

मेनन बेअरिंग्ज (Menon Bearings)

मेनन बेअरिंग्ज (Menon Bearings) या कंपनीत प्रमोटर्सची हिस्सेदारी लक्षणीय आहे. या कंपनीचा IPO 1991 मध्ये आला आणि तेव्हापासून ही कंपनी चांगली कामगिरी करत आहे. कंपनीतील प्रोमोटर्सची हिस्सेदारी 71-72 टक्क्यांपर्यंत आहे.

मेनन बेअरिंग्ज (Menon Bearings)

- सीएमपी (CMP) - 97 रुपये

- टारगेट (Target) - 110 रुपये

कंपनीचे फंडामेंटल्स ?

कंपनीचा डिविडेंड यील्ड 2.15 टक्के आहे. तर रिटर्न ऑन इक्विटी 20 टक्के आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात हा शेअर 17-18 टक्‍क्यांनी वर चढला आहे आणि इथून घसरण झाली तर यात आणखी खरेदी होऊ शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Qualifier 1 : दोन्ही अय्यरची अर्धशतके; केकेआरने हैदराबादला मात देत गाठली फायनल

Rahul Gandhi on Pune Porsche Accident: पुणे पोर्शे दुर्घटनेवरून राहुल गांधींनी PM मोदींवर सोडलं टीकास्त्र, म्हणाले 'दोन भारत...'

Pune Porsche Accident : पब चालविणे गंमत आहे का? पुणे पोर्शे अपघातप्रकरणी न्यायालयाचे आरोपींना खडेबोल

Sambit Patra : भगवान जगन्नाथांबद्दल बोलताना जीभ घसरली, भाजपचे संबित पात्रा करणार तीन दिवस उपवास, नेमकं काय म्हणाले होते?

Moringa Powder : आडवी तिडवी सुटलेली ढेरी कमी करते या पानांची पावडर, जाणून घ्या मोरिंग्याचे पाणी पिण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT