Moodies decreases estimation of growth rate of India
Moodies decreases estimation of growth rate of India  
अर्थविश्व

'मूडीज'ने घटवला भारताच्या विकासदराचा अंदाज

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जागतिक स्तरावरील पतमानांकन संस्था असलेल्या 'मूडीज'ने भारताच्या पतमानांकनात घसरण केली आहे. वर्ष 2020 साठी एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) दराचा अंदाज कमी केली आहे. वर्ष 2020 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 5.3 टक्क्यांच्या दराने वाढेल असा अंदाज मूडीजने वर्तवला आहे. फेब्रुवारीमध्ये भारताचा जीडीपी 5.4 टक्के दराने वाढेल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र जगभर थैमान घातलेल्या 'कोरोना'मुळे जगभरातील अर्थव्यवस्था मंदावल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला देखील फटका बसला आहे. या अगोदरच्या अहवालामध्ये भारताची अर्थव्यवस्था  6.6  टक्क्यांच्या दराने वाढेल असा अंदाज मूडीजने वर्तवला होता. 

कोरोना विषाणूच्या जगभर संसर्गाच्या वेगवान प्रसारामुळे अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होईल. तसेच प्रभावित देशांमध्ये याचा परिणाम देशांतर्गत मागणीवर परिणाम होत आहे. जागतिक पातळीवर पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे आणि देशादेशांमधील व्यापार कमी होतो. कोरोनामुळे जागतिक पातळीवर अशीच परिस्थिती कायम राहिल्यास जागतिक आर्थिक मंदी पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता मूडीजने व्यक्त केली आहे. तसेच 2021 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर 5.8 टक्के राहील, असा अंदाज संस्थेने वर्तविला आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांबरोबर सरकारने आर्थिक उपाययोजना केल्या आहेत. तसेच बऱ्याच बँकांनी व्याजाच्या दरात देखील कपात केली आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे सरकार करत असलेल्या उपाययोजनांचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे, असेही मत मूडीजने व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT