Multibaggers Team eSakal
अर्थविश्व

Multibagger Stock : 2 वर्षात एका लाखाचे 14 लाख, 'या' स्टॉकने दिला तगडा रिटर्न

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत 14 पटीने वाढ झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर आरएसीएल गिअरटेकच्या (RACL Geartech) शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना शॉर्ट तसंच लाँग टर्ममध्ये मोठा नफा दिला आहे.

आताही हा शेअर जवळपास 10 टक्क्यांनी वाढत 753.25 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या शेअरने गेल्या 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 33% परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत 14 पटीने वाढ झाली आहे.

आरएसीएल गिअरटेकने गेल्या वर्षभरात 22 टक्के परतावा दिला आहे. तर गेल्या 5 वर्षात त्याने 1051% परतावा दिला आहे, तर गेल्या 20 वर्षात त्याच्या गुंतवणूकदारांना तब्बल 32,650% दमदार परतावा दिला आहे.

एप्रिल 2020 मध्ये या शेअरची किंमत 53.80 रुपये होती, जी आज प्रति शेअर 753.25 रुपये झाली आहे. याचा अर्थ 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांनी बंपर नफा कमावला आहे. एप्रिल 2020 मध्ये तुम्ही त्यात 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमची रक्कम सुमारे 14 लाख रुपये झाली असती.

कंपनी काय करते ?
आरएसीएल गिअरटेक लिमिटेड ही एक दुचाकी, तीन-चाकी आणि चारचाकी वाहनांसाठी ऑटोमोटिव्ह गीअर्स आणि कंपोनेंट्स बनवण्याचे काम करते. त्यांच्या ग्राहकांमध्ये BMW, Kubota, DANA आणि Lamborgini सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

तर, देशांतर्गत बाजारपेठेत, Honda, Yamaha, KTM आणि Piaggio कंपन्यांना ऑटोमोटिव्ह गीअर्स आणि कंपोनेंट्स पुरवतात. कंपनी मोटारसायकल आणि स्कूटर, मालवाहू वाहने, कृषी यंत्रे, ट्रॅक्टर, ऑल-टेरेन व्हेइकल्स (ATV) या विभागांमध्ये ऑटोमोटिव्ह घटक तयार करते.

सब-असेंबली, इलेक्ट्रिकल स्विच गियर आणि सर्किट ब्रेकर्ससाठी इंडस्ट्रियल गियर आणि विंच आणि क्रेन प्रोव्हाईड करते. कंपनीच्या उत्पादनांमध्ये ट्रान्समिशन गिअर्स आणि शाफ्ट्स, रिडक्शन गीअर्स ट्रेन सीव्हीटी गियर बॉक्स, इंजिन टायमिंग गियर्स, सब-असेंबली, स्प्रॉकेट्स आणि रॅचेट्स, प्रिसिजन मशीन केलेले पार्ट्स, सिंक्रोनाइझिंग कोन आणि रिंग्स आणि इंडस्ट्रियल गिअर्स यांचा समावेश आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT