अर्थविश्व

नीरव मोदीकडून साक्षीदारांना जीवे मारण्याची धमकी

वृत्तसंस्था

लंडन : पीएनबी गैरव्यवहारप्रकरणी फरार असलेल्या नीरव मोदीने साक्षीदार फोडण्यासाठी त्यांना 20 लाख रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामध्ये अपयश आल्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप लंडनच्या वकिलांनी आज (शुक्रवार) केला. लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयात नीरव मोदीविरोधात आज सुनावणी सुरु आहे. यावेळी त्यांनी मोदीला जमीन मिळू नये, तसेच नवीन पुरावे हाती लागल्याचे सांगत जोरदार युक्तिवाद केला.

पीएनबी गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी नीरव मोदीबाबत आज लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान आणखी काही महत्वाचे दस्तावेज आणि पुरावे सादर करण्यासाठी सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संयुक्त पथक लंडनमध्ये दाखल झाले आहे. नीरव मोदीचे वकील त्याच्या जामिनासाठी न्यायालयात आपली बाजू मांडणार आहेत. तर दुसरीकडे ईडी आणि सीबीआय त्याला जामीन मिळू नये. तसेच भारताकडे सोपवण्यात यावे, यासाठी आपली बाजू मांडणार आहेत. लंडनच्या स्थानिक प्रमाणवेळेनुसार आज सकाळी 11 वाजता या सुनावणीला सुरवात झाली आहे.

लंडनमधील मेट्रो बँकेत खाते उघडण्यासाठी गेलेल्या नीरव मोदीला बँक कर्मचाऱ्याने ओळखल्याने त्याला 20 मार्च रोजी लंडनमध्ये अटक झाली होती. अटकेनंतर नीरव मोदीने लंडन येथील वेस्टमिन्स्टर न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तसेच कर भरल्याचे आणि प्रवासाचे कागदपत्रही सादर केले होते. परंतु जिल्हा न्यायाधीश मॅरी मॅलान यांनी जामिन अर्ज नामंजूर करत 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. तेव्हापासून तो दक्षिण-पश्चिम लंडनमधील वैंड्सवर्थ तुरुंगात कैद आहे.

विशेष म्हणजे, वेस्टमिन्स्टरचे मुख्य न्यायाधीश एमा आर्बथनॉट यांच्या न्यायालयात आज नीरव मोदीच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. याच न्यायाधीशांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मद्यसम्राट विजय मल्याला भारतात प्रत्यार्पणाचा आदेश दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT