Adani Group Row Sakal
अर्थविश्व

Adani Group Row : अदानींवर निर्मला सीतारामन यांचं मोठ वक्तव्य म्हणाल्या, कर्ज देणाऱ्या बँकांनी...

हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूह अनेक अडचणींचा सामना करत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Adani Group Row News : हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूह अनेक अडचणींचा सामना करत आहे. अदानी समूहाचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत.

त्याचबरोबर सरकारनेही आता अदानी समूहाबाबत मौन सोडले असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वतीने अदानी समूहाबाबत मोठे वक्तव्य करण्यात आले आहे. (Adani Group Row news in Marathi)

अदानी समूहाने अनेक बँकांकडून कर्ज घेतले आहे. भारतातील अनेक बँकांनी अदानी समूहाला कर्ज दिले आहे.

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अदानी समूहाबाबत विधान केले आहे की, कर्ज देणाऱ्या बँकांनी हे स्पष्ट केले आहे की, ते ओव्हरएक्सपोज केलेले नाहीत, अदानी समूहाला परवानगी दिलेल्या मर्यादेत कर्ज दिले गेले आहे.

अदानी शेअर्स :

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, एसबीआय (SBI News) आणि एलआयसी (LIC News) या दोघांनी सांगितले आहे की, ते अदानी समुहात जास्त एक्सपोज केलेले नाहीत.

दोघांचे म्हणणे आहे की, अदानी समूहाकडे जे काही एक्स्पोजर आहे, ते नफ्यावरच अवलंबून आहे आणि मूल्यांकन घसरल्यानंतरही ते नफ्यातच आहेत.

हिंडेनबर्ग अहवाल :

हिंडनबर्गने अदानी समूहाबाबत एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात अदानी समूहावर फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीने शेअर्सच्या किमती वाढवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा : रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

हा अहवाल आल्यानंतर अदानी समूहाला सतत अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतीय शेअर बजारातील अदानी समूहाच्या शेअर्सवरही गेल्या काही दिवसांपासून दबाव आला असून त्यांच्या समभागांमध्ये लोअर सर्किट दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला, शाहिद आफ्रिदीचा सूर बदलला; आता म्हणतो, भारतच दावेदार होता, संजू सॅमसन....

Latest Marathi News Live Update : सोलापुरात घरगुती गॅस ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करताना तांत्रिक अडचणी

Sambhajinagar Panchayat Samiti : छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती सभापती निवडणुकीपूर्वी गोंधळ; ठाकरेंच्या गटाचे तीन सदस्य गायब

Woman Success Story: राेपवाटिकेच्‍या पश्चिम महाराष्ट्रात १३ शाखांद्वारे राेजगार; शारदा भाेसलेंची नावीन्यपूर्ण यशस्‍वी भरारी, राज्यभर बाेलबाला!

"आमच्यात फक्त मैत्री.." विशालसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर रुचिताचा खुलासा ! म्हणाली..

SCROLL FOR NEXT