saving 
अर्थविश्व

अल्पबचत योजनांबाबत केंद्राचा महत्त्वाचा निर्णय; सर्वसामान्य गुंतवणूकदारांना दिलासा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी (जानेवारी ते मार्च २०२१) 'पीपीएफ', 'एनएससी'सह विविध अल्पबचत योजनांचे व्याजदर कायम ठेवले आहेत. सलग तिसऱ्या वेळी सरकारने व्याजदर कायम ठेवल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.

चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत अल्पबचत योजनांच्या व्याजदरात मोठी कपात करण्यात आली होती. त्यावेळी साधारणपणे ०.७० टक्के ते १.४० टक्के इतकी मोठी कपात केल्याने गुंतवणूकदारांना मोठी झळ बसलेली होती.

अल्पबचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), किसान विकास पत्र (केव्हीपी), मुदत ठेवी (टीडी), मासिक प्राप्ती योजना (एमआयएस), पुरनावर्ती ठेव (आरडी), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस), सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) आदी योजनांचा समावेश होतो. याशिवाय पोस्टात बचत खात्याची (एसबी) सोयदेखील असते व त्यावर सध्या वार्षिक ४ टक्के दराने व्याज दिले जाते.

अल्पबचत योजनांचे व्याजदर

  • पोस्टातील एसबी : ४ टक्के
  • पीपीएफ : ७.१ टक्के
  • एनएससी : ६.८ टक्के
  • केव्हीपी : ६.९ टक्के
  • (१२४ महिन्यांत दुप्पट)
  • पाच वर्षीय टीडी : ६.७ टक्के
  • एमआयएस : ६.६ टक्के
  • आरडी : ५.८ टक्के
  • एससीएसएस : ७.४ टक्के
  • एसएसवाय : ७.६ टक्के

अल्पबचत योजना प्रामुख्याने पोस्टाच्या; तसेच निवडक बॅंकांच्या माध्यमातून राबविल्या जातात. या योजनांवरील व्याजदराचा केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून दर तिमाही आढावा घेण्यात येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT