reconciliation agreement sakal media
अर्थविश्व

हैद्राबाद इथे उभा राहणार तेल उत्खन्नन उपकरणांचा निर्मीती प्रकल्प

तेलंगणा सरकार यांच्यात झाला सामंजस्य करार

विनोद राऊत

मुंबई : आपण कायम परदेशी कंपन्या (Foreign company) यशस्वी ठरलेल्या भारतीय कंपन्यांना (Indian Company) चांगले पैसै मोजून विकत घेताना पाहीले असेल, मात्र यावेळी एका भारतीय कंपनीने इटलीची कंपनी विकत घेतली, तीही तेल उत्खन्नन उपकरणांच्या निर्मिती क्षेत्रातील बलाढ्य कंपनी. ६० देशांना अत्याधुनिक उपकरण पुरवणाऱ्या इटलीच्या ड्रिलमेक एसपीए (Italy spl company) या कंपनीला तेलंगणाच्या मेघा इंजिनीअरींग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लि. (MEIL) या कंपनीने 2020 मध्ये विकत घेतलं. आता लवकरचं हैद्राबाद (hyderabad) इथे या कंपनीचा प्रकल्प उभा राहणार असून, या माध्यमातून अडीच हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.

production house

हैद्राबाद स्थित मेघा इंजिनीअरींग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लि. (MEIL) या बलाढ्य उद्योग समुहाची ड्रिलमेक एसपीए उपकंपनी झाली आहे आणि तेलंगणातल्या हैदराबाद इथे ही कंपनी आता स्वताचे जागतिक उत्पादन केंद्र स्थापन करणार आहे. महत्वाचे म्हणजे हैद्राबाद इथूनच या कंपनीचे संचलन होणार आहे. ड्रिलमेक एसपीए, ऑइल-ड्रिलिंग रिग्स मॅन्युफॅक्चरीगंच्या हैद्राबाद या उत्पादन प्रकल्पासाठी 200 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करणार आहे, यात उत्पादन, संशोधन आणि विकास केंद्र व यासाठी लागणारे उत्तम दर्जाचे मनुष्यबळ मिळण्यासाठी अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र यांचा समावेश असेल.

ड्रिलमेकने तेल रिग आणि सहायक उपकरणे तयार करण्यासाठी स्थापण्यात येणाऱ्या या इंटरनॅशनल हबसाठी तेलंगणा सरकारच्या उद्योग आणि वाणिज्य विभागासोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. ड्रिलमेकच्या प्रतिनीधीनी सांगीतले की तेलंगणा सरकारसोबत काम करणे हा मोठा सन्मान असेल तसेच हे उत्पादन केंद्र सुमारे 2,500 लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण करेल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT