amazon-great-indian-festival 
अर्थविश्व

अनेक नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची आता संधी; विविध फोन्सवर मिळणार सवलत

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ येत्या शनिवारपासून (ता. १७) सुरू होत असून, त्यात बाजारात नव्याने आलेले अत्याधुनिक स्मार्टफोन्स खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. 

मोठ्या रेंजचे स्मार्टफोन्स ‘फेस्टिव्हल’मध्ये उपलब्ध होणार आहेत. सॅमसंग, वनप्लस, ॲपल, ओप्पोसह ज्या कंपन्यांच्या ताज्या स्मार्टफोन्सची ग्राहक प्रतीक्षा करत होते, ते मिळण्याची संधी मिळेल. ‘ॲमेझॉन प्राइम’ सदस्यांना फोन २४ तास आधीच म्हणजे शुक्रवारपासूनच (ता. १६) उपलब्ध होणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फेस्टिव्हलमध्ये विविध स्मार्टफोन्सवर चाळीस टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. एचडीएफसी बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड्‌सवर अतिरिक्त दहा टक्के इन्स्टंट डिस्काउंट; क्रेडिट आणि डेबिट कार्ड्‌सवर नो-कॉस्ट ईएमआय; एक्स्चेंज ऑफर्स; ॲमेझॉन पे यूपीआयद्वारे रोज पाचशे रुपयांची शॉपिंग रिवॉर्ड्‌स ग्राहक मिळवू शकतात. ॲमेझॉन पे गिफ्ट कार्ड्‌स; ॲमेझॉन पे लेटर आणि ॲमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड उपलब्ध. 

फेस्टिव्हलमध्ये हे स्मार्टफोन्स उपलब्ध होणार आहेत (एचडीएफसी कार्ड्‌सद्वारे अतिरिक्त दहा टक्के सवलत; तसेच सहा किंवा बारा महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआय ऑफर उपलब्ध) :

वनप्लस ८ टी : ॲमेझॉनवर एक्स्क्लुझिव्ह लॉंच होणारा फोन. १२० हर्ट्‌झ फ्लुइड ॲमोलेड डिस्प्ले, ५जी स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, ४८ एमपी क्वॉड कॅमेरा; ऑक्सिजन ओएस. फोनची किंमत १४ ऑक्टोबरला रात्री साडेआठ वाजता जाहीर होईल. 

सॅमसंग गॅलॅक्सी एम ३१ प्राइम : नवीन व्हेरिअंट दाखल. ६ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज, ६४ एमपी क्वॉड कॅमेरा, ६००० एमएएच बॅटरी; एफएचडी+ सॅमोलेड डिस्प्ले. किंमत १६,४९९ रुपयांपासून सुरू. तीन महिन्यांचे प्राइम सदस्यत्व आणि मर्यादित काळासाठी १,००० रुपयांची ॲमेझॉन पे कॅशबॅक. 

सॅमसंग गॅलॅक्सी एस२० एफई : सॅमसंगचा ताजा फोन. एफएचडी+ होल इन डिस्प्ले, १२० हर्ट्‌झ ॲमोलेड डिस्प्ले, ३०x झूम, ३२ एमपी फ्रंट कॅमेरा, एक्झिनॉस ९९० प्रोसेसर, ४५०० एमएच बॅटरी. फोन ४९,९९९ रुपयांना उपलब्ध असून, ४००० रुपयांची इन्स्टंट बँक सवलत.

ओप्पो ए १५ : या रेंजमधील अतिशय रास्त किंमत असलेला फोन. एआय ट्रिपल कॅमेरा आणि ६.५२ इंच वॉटर ड्रॉप डिस्प्ले. फोन १९ ऑक्टोबरपासून उपलब्ध.

मिड-रेंज फोन्स -
रेडमी नोट ९ : गेमिंग आणि हाय परफॉर्मन्ससाठी उपयुक्त. मेडियाटेक हेलिओ जी ८५ प्रोसेसर, ४८ एमपी क्वॉड कॅमेरा, ६.५३ इंच एफएचडी+ डिस्प्ले, ५०२० एमएएच बॅटरी. किंमत १०,९९९ रुपयांपासून सुरू. 

रेडमी नोट ९ प्रो : परफॉर्मन्समधील उच्च दर्जा असलेला फोन. उच्च दर्जाचा स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर, ६.६७ एफएचडी+ डिस्प्ले, क्वॉड कॅमेरे आणि ५०२० एमएएच बॅटरी समाविष्ट. किंमत १२,९९९ रुपयांपासून. 

रेडमी नोट ९ प्रो मॅक्स : फोटोग्राफीमध्ये रस असलेल्यांसाठी उपयुक्त. ६४ एमपी क्वॉड-कॅमेरा, ३२ एमपी सेल्फी कॅमेरा, स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर, ६.६७ एफएचडी+ डिस्प्ले; ५०२० एमएएच बॅटरी. किंमत १५,९९९ रुपयांपासून.

सॅमसंग गॅलॅक्सी एम २१ : फोटोग्राफी, मनोरंजन आणि बिंजिंगसाठी उपयुक्त. ४८ एमपी ट्रिपल कॅमेरा, ६००० एमएएच बॅटरी, फुल एचडी+सॅमोलेड डिस्प्ले. किंमत १२,९९९ रुपयांपासून. 

सॅमसंग गॅलॅक्सी एम ३१ : बेस्टसेलर स्मार्टफोन. ६४ एमपी क्वॉड कॅमेरा, ६००० एमएएच बॅटरी, एफएचडी+ सॅमोलेड डिस्प्ले. किंमत १५,४९९ रुपयांपासून. मर्यादित काळासाठी १,००० रुपयांची अतिरिक्त ॲमेझॉन पे कॅशबॅक. 

सॅमसंग गॅलॅक्सी एम ३१ एस : या रेंजमधील सर्वांत प्रॉमिसिंग कॅमेरा असलेला फोन. ६४ एमपी सोनी आयएमएक्स ६८२ सेन्सर; इंटेली-कॅमेरा; इन्फिनिटी –O-सॅमोलेड डिस्प्ले; ६००० एमएएच बॅटरी. किंमत १८,४९९ रुपयांपासून. 

ओप्पो ए ५२ : एआय क्वॉड कॅमेरा सेटअपमुळे आकर्षक. ६ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज, ५००० एमएएच बॅटरी, स्नॅपड्रॅगन ६६५ ऑक्टाकोअर प्रोसेसर आणि एफएचडी+ निओ डिस्प्ले. किंमत १३,९९० रुपयांपासून.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूलाजवळ भीषण अपघात! , दोन कंटेनरची धडक अन् भयानक आगडोंब ; पाच जणांचा मृत्यू

DMart : डीमार्टमधली चोरी थांबवण्यासाठी कंपनीने केली भन्नाट आयडिया; तुम्ही चुकूनही या ट्रॅपमध्ये अडकू नका..खरेदीला जाण्यापूर्वी हे बघाच

Delhi Bomb Blast: तो मसूद अझहर नाहीतर...; दिल्ली बॉम्बस्फोटांचा खरा सूत्रधार कोण? कट कुणी रचला? हँडलरचे नाव आले समोर

Bageshwar Dham Dhirendra Shastri Health : बाबा बागेश्वर धीरेंद्र शास्त्रींची तब्येत बिघडली; सनातन एकता पदयात्रेत आली चक्कर अन् झाले बेशुद्ध

Latest Marathi Breaking News Live : मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या दोन्ही अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

SCROLL FOR NEXT