Pan_Aadhar_Link 
अर्थविश्व

पॅन आधारशी असं करा लिंक; उद्या शेवटचा दिवस

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशभरातील नागरिकांसाठी पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. जर तुम्ही अजूनही तुमचं पॅन कार्ड (Permanent Account Number) तुमच्या आधार कार्डशी (Aadhaar Card) लिंक केलं नसेल, तर ते लवकर लिंक करून घ्या. कारण पॅन आधारशी लिंक करण्यासाठी ३१ मार्च २०२१पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्याकडे फक्त एकच दिवस शिल्लक राहिला आहे. 

इन्कम टॅक्स भरणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही आधार लिंक केलं नसेल तर तुम्हाला १ हजार रुपयांपर्यंत दंडही आकारण्यात येणार आहे. केंद्र सरकारने पॅन कार्ड आधारशी जोडण्यासाठी अनेकवेळा मुदत वाढवली आहे. त्यामुळे आता मुदतवाढ मिळेल की नाही, याबाबत काही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे दंड भरण्यापेक्षा आधार लिंक करून घ्या. नाहीतर तुमचं पॅन क्रमांकदेखील अवैध ठरवला जाणार आहे.

पॅन आधार असं करा लिंक

पहिली पद्धत

- सर्वप्रथम ई-फायलिंगच्या वेबसाईटवर जा. 
- त्यानंतर तुमच्या आधार कार्डवर जसं नाव आहे, तसं नाव, पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्डचा नंबर भरा. 
- जन्मतारखेचा उल्लेख असेल तर स्क्वॉयर टिक करा. 
- त्याठिकाणी आलेला कॅप्च कोड भरा. आणि ओटीपीसाठीची रिक्वेस्ट पाठवा. तुम्ही नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. 
- आधार लिंक पर्याय निवडा. 

दुसरी पद्धत
- UIDPAN १२ अंकी आधार क्रमांक लिहा.
- त्याखाली १० अंकी पॅन कार्ड नंबर लिहा.
- हा मेसेज ५६७६७८ किंवा ५६१६१ वर पाठवा. 

दरम्यान, गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने लोकसभेत वित्त विधेयक २०२० मंजूर केले. यावेळी २३४ एच हे नवीन कलम समाविष्ट करण्यात आलं आहे. या अंतर्गत एखाद्या व्यक्तीने पॅन आधारशी न जोडल्यास एक हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यात येणार आहे. 

३१ मार्चपर्यंत पॅन आधारला लिंक न केल्यास दंड आकारला जाईल की नाही, तसेच त्यासाठी दंड आकारण्याची नेमकी रक्कम नमूद करण्यात आली नाही, तरीही सरकारने हे विधेयक संसदेत मंजूर करून घेतले. अधिसूचनेनंतर अंमलबजावणी करण्याच्या अधिकाराचा उल्लेख शासकीय राजपत्रात करण्यात आला आहे. 

- अर्थविश्वातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT