अर्थविश्व

राज्यातील सात जिल्ह्यात पेट्रोल शंभरीपार, महागाईचा चटका

नामदेव कुंभार

Petrol Diesel Price Today 25th May 2021 : यूरोपमधील (European Countries) जवळपास सर्व देशातील प्रवासबंदी (Restriction on Travel) संपली आहे. जगातील सर्वात मोठी आणि महत्वपूर्ण अर्थव्यवस्था (Important Economy of the World) पुन्हा एकदा सरु झाली आहे. तसेच अमेरिकेतील प्रवासही वाढला आहे. त्यामुळे पेट्रोलियम पदार्थांची मागणी वाढली आहे. याचा कच्च्या तेल (Crude Oil Price) बाजारावर परिणम झालाय. सोमवारी कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये दोन टक्केंची वाढ पाहायला मिळाली. याचाच परिणाम भारतातील इंधन दरवाढीवर झाला आहे. भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरात वाढ झाली आहे.

भारतामध्ये डिझेलमध्ये प्रतिलीटर 25 पैसांनी महागलं आहे. तर पेट्रोल प्रति लीटर 23 पैशांनी महागलं आहे. मंगळवारी राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रतिलीटर 93.44 रुपये होतं. तर डिझेल 84.32 रुपये प्रति लीटर वर पोहचलं आहे. मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलमध्ये सरासरी 3 रुपयांनी वाढ पाहायला मिळाली. मंगळवारी मुंबई आणि पुण्यात पेट्रोल शंभर रुपयांच्या जवळ पोहचलं आहे. राज्यातील सात जिल्ह्यात पेट्रोलच्या किंमतीनं शंभरचा आकडा ओलांडला आहे. तर काही जिल्ह्यात 99 च्या आकडा पार केला आहे. मुंबई आणि पुण्यात पेट्रोल 99.70 रुपये प्रतिलीटर झालं आहे.

खालील सात जिल्ह्यात पेट्रोलचं शतक -

शहराचं नाव पेट्रोल/प्रतिलीटर डिझेल/प्रतिलीटर

परभणी 102.02 92.46

सिंधुदुर्ग 101.2. 91.63

नांदेड 101.00 92.26

रत्नागिरी 100.99 91.43

जळगाव 100.86 91.28

नाशिक 100.19 90.63

वर्धा 100.07 90.55

आपल्या शहरात काय आहेत भाव?

पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price) आपण SMS च्या द्वारे देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, आपल्याला RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 नंबर वर SMS पाठवायचा आहे. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा आहे. हा कोड आपल्याला IOCL च्या वेबसाईटवरुन मिळेल.

दररोज सकाळी सहा वाजता बदलतात किंमती

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती दररोज बदलत असतात. त्यानुसार दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किंमतींमध्ये बदल होतात. सकाळी सहा वाजल्यापासून नव्या किंमती लागू केल्या जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर गोष्टींसह या पेट्रोलचे भाव जवळपास दुप्पट होतात. परकीय चलनांसहित आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमती काय आहेत या आधारावर दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किंमतींमध्ये बदल होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT