petrol diesel price
petrol diesel price 
अर्थविश्व

Petrol Diesel Price : 24 दिवसानंतर पेट्रोल डिझेल घसरलं; दरात कपात

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - पेट्रोल डिझेलच्या दरवाढीला बऱ्याच दिवसांनी ब्रेक लागला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल डिझेलच्या दरात कपात केली. तब्बल 24 दिवस पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर ठेवल्यानंतर आज दर कमी केले आहेत. आंतरराष्ट्रीय बादारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यानं भारतीय बाजारात तेलाचे दर कमी करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 15 दिवसांमध्ये जवळपास 10 टक्के घसरले आहेत. युरोपात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असून तिथे इंधनाची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 71 डॉलरवरून 64 डॉलर इतक्या खाली आल्या आहेत. 

बुधवारी तेल कंपन्यांनी पेट्रोलची किंमत 18 पैसे तर डिझेलची किंमत 17 पैशांनी कमी केली. यानंतर दिल्लीत एक लीटर पेट्रोलचा दर 90 रुपये 99 पैसे इतका तर डिझेलचा दर 81 रुपये 30 पैसे इतका झाला आहे. गेल्या महिन्यात 10 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत तेलाच्या दरात मोठी वाढ झाली होती. पेट्रोल डिझेलचे दर जवळपास 4 ते 5 रुपयांनी वाढले होते. मात्र 26 फेब्रुवारीनंतर क्रूड ऑइलचे दर 8 डॉलरहून अधिक वाढले आहेत. मात्र या कालावधीत फक्त 27 फेब्रुवारीला दरात किरकोळ वाढ झाली होती. 

देशात सर्वाधिक पेट्रोलचे दर भोपाळमध्ये असून 99 रुपये प्रतिलिटर इतका दर आहे. त्याखालोखाल मुंबईत 97 रुपये 40 पैसे इतक्या दराने पेट्रोलची विक्री होत आहे. तर सर्वात कमी चंदिगढमध्ये 87 रुपये 56 पैसे प्रति लिटर इतक्या दराने विक्री होत आहे. बेंगळुरूत 94 रुपये तर पाटणामध्ये 93 रुपये 31 पैसे दराने पेट्रोल विकलं जात आहे. भोपाळमध्ये डिझेल 89 रुपये 58 पैसे प्रति लिटर इतकं आहे. तर मुंबईथ 88 रुपये 42 पैसे आणि चंदिगढमध्ये 81 रुपये प्रति लिटर इतकी किंमत आहे.

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये दररोज सकाळी 6 वाजता बदल होतो. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक्साइज ड्युटी, डिलर कमीशन आणि इतर करांमुळे दुप्पट वाढ होते. परदेशी चलनाची किंमत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किंमती यावर ठरते. यानुसारच पेट्रोल डिझेलचा दर दररोज बदलत असतो. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: POK भारताचे आहे अन् आम्ही ते परत घेऊ; अमित शाह यांचा इशारा

Pune Loksabha: धंगेकर की मोहोळ? कँटोन्मेंटमधील 'हे' गणित ठरवणार कोणत्या उमेदवाराला मिळणार आघाडी

Panchayat 3 : वेळेआधीच पंचायत 3 चा ट्रेलर प्रदर्शित; पुन्हा एकदा रंगणार गावकरी आणि सचिवाची जुगलबंदी

Mahadev App: महादेव बेटिंग अ‍ॅपचे पुणे कनेक्शन, व्यापाऱ्यासह 70 जणांना अटक

IPL 2024 : 18 मे रोजी होणारा RCB Vs CSK सामना पावसामुळे रद्द झाला तर… प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र?

SCROLL FOR NEXT