Petrol-Price Today esakal
अर्थविश्व

Petrol-Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये दिलासा; देशात आजचे दर काय?

सकाळ डिजिटल टीम

भारतीय तेल कंपन्यांनी आज नेहमीप्रमाणं पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत.

Petrol-Diesel Price Today : भारतीय तेल कंपन्यांनी (Indian oil companies) आज (4 जुलै, सोमवार) नेहमीप्रमाणं सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel) नवीन दर जाहीर केले आहेत. आजही तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाहीय. देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपयांना विकलं जात आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. तिथं एक लिटर पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपयांना विकलं जात आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता इथं पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. त्याच वेळी, चेन्नईबद्दल बोलायचं झालं तर, पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आहे, तर डिझेल 94.24 रुपयांना विकलं जात आहे.

देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये बराच काळ बदल झालेला नसल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत जनतेला दिलासा मिळत आहे. केंद्र सरकारनं 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केलं. त्यामुळं देशभरात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. दरम्यान, उत्पादन शुल्कात कपात करण्यापूर्वी देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती विक्रमी पातळीवर होत्या. मार्च-एप्रिलमध्ये युक्रेन-रशिया तणावाच्या काळात वाहनांच्या इंधनावर सतत भाववाढ होत होती, त्यामुळं लोक नाराज झाले होते.

महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

शहर पेट्रोल डिझेल

दिल्ली 96.72 89.62

मुंबई 111.35 97.28

चेन्नई 102.63 94.24

कोलकाता 106.03 92.76

प्रमुख शहरांमध्ये इंधनाच्या किमती जाणून घ्या

  • भोपाळमध्ये पेट्रोल 108.65 रुपये आणि डिझेल 93.90 रुपये आहे.

  • अहमदाबादमध्ये पेट्रोल 96.42 रुपये आणि डिझेल 92.17 रुपयांना विकलं जात आहे.

  • अजमेरमध्ये पेट्रोल 108.85 रुपये, डिझेल 94.06 रुपये आहे.

  • रांचीमध्ये पेट्रोल 99.84 रुपये, डिझेल 94.65 रुपयांना विकलं जात आहे.

  • श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 113.65 रुपये, डिझेल 98.39 रुपये आहे.

तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत SMS द्वारे तपासा

तुमच्या फोनवरून एसएमएसद्वारे तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT