Petrol Diesel Price  sakal
अर्थविश्व

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! काही राज्यांमध्ये पेट्रोल 100 च्या पुढे

काही राज्यांमध्ये पेट्रोलचे दर (Petrol Rate) आजही 100 रुपयांपेक्षा जास्त आहेत.

सकाऴ वृत्तसेवा

काही राज्यांमध्ये पेट्रोलचे दर (Petrol Rate) आजही 100 रुपयांपेक्षा जास्त आहेत.

भारतीय तेल कंपन्यांनी आज सोमवारी (27 डिसेंबर) पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Price) जाहीर केले. 27 डिसेंबर रोजी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. काही राज्यांमध्ये पेट्रोलचे दर (Petrol Rate) आजही 100 रुपयांपेक्षा जास्त आहेत. सध्या दिल्लीत (Delhi) पेट्रोलचे दर 95.41 रुपये प्रतिलिटर आहे तर डिझेलचे दर 86.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत (Mumbai) एक लिटर पेट्रोल 109.98 रुपये तर डिझेल 94.14 रुपये दराने विकले जात आहे.

Petrol Diesel Price

केंद्राने गेल्या महिन्याच्या सुरुवातीला उत्पादन शुल्कात (Excise duty) कपात केल्यानंतर इंधनाचे दर स्थिर आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल होऊन 50 दिवसांहून अधिक दिवस झाले आहेत. 1 डिसेंबर रोजी केजरीवाल सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर (VAT) 30टक्क्यांवरून 19.40 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा दिल्लीत पेट्रोलच्या किमतीत घट झाली.

Petrol, Diesel prices

हे आहेत पेट्रोल आणि डिझेलचे दर

- दिल्ली : पेट्रोल - 95.41 प्रति लिटर; डिझेल - 86.67 प्रति लिटर

- मुंबई : पेट्रोल - 109.98 प्रति लिटर; डिझेल - 94.14 प्रति लिटर

- कोलकाता: पेट्रोल - 104.67 प्रति लिटर; डिझेल - 89.79 प्रति लिटर

- चेन्नई: पेट्रोल - 101.40 रुपये प्रति लिटर; डिझेल - 91.4 प्रति लिटर

- बेंगळुरू : पेट्रोल - 100.58 प्रति लिटर; डिझेल - 85.01 प्रति लिटर

- लखनऊ : पेट्रोल - 95.02 रुपये प्रति लिटर, डिझेल - 86.56 रुपये प्रति लिटर

- हैदराबाद : पेट्रोल - 108.20 रुपये प्रति लिटर, डिझेल - 94.62 रुपये प्रति लिटर

- तिरुवनंतपुरम : पेट्रोल - 106.65 रुपये प्रति लिटर, डिझेल - 93.47 रुपये प्रति लिटर

- नोएडा : पेट्रोल - 95.51 रुपये प्रति लिटर, डिझेल - 87.01 रुपये प्रति लिटर

- गुरुग्राम : पेट्रोल - 95.90 रुपये प्रति लिटर, डिझेल - 87.11 रुपये प्रति लिटर

petrol diesel price today

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा

- या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पुढचे ४ दिवस पावसाचे, हवामान विभागाचा अंदाज; कोयना, अलमट्टीतून विसर्ग वाढला

Maharashtra Politics: ‘गूँगी गुडिया’ वादावरून काँग्रेस-राष्ट्रवादी आमनेसामने; गांधी भवनात घोषणाबाजी, सुनेत्रा पवारांवरील पोस्टने पेटला वाद

Maharashtra IMA Strike: सीसीएमपी होमिओपॅथांना अलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी; नोंदणीविरोधात ११ हजार डॉक्टरांचा बेमुदत संप सुरूच

सोलापूर जिल्हा परिषदेचा नियम म्हणजे नियम! वैद्यकीय अधिकारी म्हणाले, ५ जणांना कुत्रा चावला तरच मिळेल लस; सदस्यांचा संताप, वाचा...

आजचे राशिभविष्य - ५ ऑगस्ट २०२६

SCROLL FOR NEXT