petrol diesel hike sakal
अर्थविश्व

Petrol Diesel Price: डिझेलही शंभरी पार! जाणून घ्या पेट्रोलचे आजचे दर

आज पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Petrol Diesel Price Updates: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजही 80 पैशांची घसरण झाली आहे. बुधवारी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जाहीर केले. देशभरात पेट्रोलचा प्रतिलीटर दर 100 रुपयांच्या पुढे गेला होता आता डिझेलनेही शंभरी पार केली आहे. मुंबईत डिझेलने आता 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. 80 पैशांच्या वाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 101.01 रुपयांवर पोहोचले आहेत.

मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलीटर 115.88 रुपये तर डिझेलचा दर 100.1 प्रतिलीटरवर पोहोचला आहे. युक्रेन रशिया युद्धामुळे निवडणूकांमुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढणार हे नक्की होते. पाच राज्यांच्या निवडणूकांचे निकाल हाती आल्यानंतर काही दिवसांतच पेट्रोल किमती वाढायला लागल्या. 7 मार्च रोजी निवडणुका संपल्या आणि 22 मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू लागले. तेल कंपन्यांनी 22 मार्चपासून (24 मार्च वगळता) पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरूच ठेवली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आमच्या नियंत्रणाबाहेर: नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरांचे समर्थन केले आहे. नुकतेच गडकरी म्हणाले की, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आहेत, त्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर झाला आहे. ही परिस्थिती सरकारच्या नियंत्रणाबाहेर असल्याचे ते म्हणाले.

10 मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता होती, मात्र पेट्रोलियम कंपन्यांनी 22 मार्चपासून दर वाढवण्यास सुरुवात केली. भारतीय पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्यांनी 24 मार्च व्यतिरिक्त गेल्या 6 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT